News Flash

आजचं राशीभविष्य, मंगळवार, ११ मे २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:- मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमातून कार्यसिद्धी होईल. मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल. काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.
  2. वृषभ:- सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामात कसलीही हयगय करू नका. नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. विलंबावर मात करावी लागेल.
  3. मिथुन:- प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. निराशेच्या आहारी जाऊ नका. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
  4. कर्क:- कामाची योग्य पोचपावती मिळेल. उष्णतेचे विकार जाणवतील. मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.
  5. सिंह:- कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. अनपेक्षित गोष्टींचा फार विचार करू नका. भागीदाराच्या मताचा आदर करावा.
  6. कन्या:- कामाची फार चिंता करू नका. चोरांपासून सावध राहावे. जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका. प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे.
  7. तूळ:- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा. जुगारापासून दूर राहावे. चैनीकडे अधिक कल राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.
  8. वृश्चिक:- चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. शेअर्स मधून धनलाभाची शक्यता. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.
  9. धनू:- कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल. एकंदरीत कामाचा उरक वाढला जाईल. काही वेळेस नमते घ्यावे लागेल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.
  10. मकर:- मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जबाबदारी आनंदाने पार पाडाल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
  11. कुंभ:- क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे. घरगुती गोष्टींनादेखील प्राधान्याने विचारात घ्यावे. जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका.
  12. मीन:- मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. कर्तृत्वाने स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. सारासार विचार करण्यात भर द्याल. नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope tuesday 11 may msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, सोमवार, १० मे २०२१
2 आजचं राशीभविष्य, रविवार, ९ मे २०२१
3 आजचं राशीभविष्य, शनिवार, ८ मे २०२१
Just Now!
X