मेष

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे, वादविवाद टाळावेत. कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. उत्तम व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. गणपती मंदिरामध्ये लाल, तांबडी फुले अर्पण करणे.
आजचा रंग- हिरवा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. नोकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. गृहिणीनी आणि ज्येष्ठांशी उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासांचे योग संभवतात. आर्थिक नियोजन जपून करावे. खर्च संभवतो. गणपती मंदिरात हिरवे धान्य अर्पण करणे.
आजचा रंग – आकाशी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवून शकाल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती चांगली राहील. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावा.
आजचा रंग – पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडीत एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घरांचे प्रश्न मार्गी लागतील. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन करावे.
आजचा रंग – निळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासांचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे उपवास करावा.
आजचा रंग -पांढरा

धनु

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. लक्ष्मी अष्टक सकाळी संध्याकाळी म्हणणे.
आजचा रंग – निळा

मकर

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या भेटी गाठीचे योग. नोकरदारांना संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. लक्ष्मी अष्टकांचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

मीन

आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. दगदगीचा दिवस. परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. कुलस्वामिनी मंदिरात पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण करावा.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu