12 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ जुलै २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-कामात जैसे थे परिस्थिती राहील. काही जबाबदार्‍या नव्याने वाढतील. आवडी निवडीबाबत आग्रही राहाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. चटपटीत पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल.

वृषभ:-सर्वांशी तोंडात साखर ठेवून वागाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चार चौघात मिळून मिसळून वागाल. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. हौस पूर्ण करून घ्याल.

मिथुन:-वरिष्ठांच्या सल्ल्याने तजवीज करावी. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तसेच काही खर्च देखील वाढतील. मानसिक दोलायमानता दूर करावी. कामाचे नियोजन यशस्वी होईल.

कर्क:-कामाचा आवाका लक्षात घ्या. क्षुल्लक गोष्टींमुळे कामे रेंगाळू शकतात. अडथळ्यातून प्रयत्नाने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-तरूणांशी मैत्री वाढेल. त्यांचे नवीन विचार जाणून घ्याल. बरेच दिवसा नंतर जुने मित्र भेटतील. कमिशनमधून चांगला लाभ उठवाल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.

कन्या:-एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. चार चौघांसमोर तुमची कला सादर करता येईल. मुलांकडून गोड बातम्या मिळतील.

तूळ:-कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीकडून मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मोठ्या लोकांची ओळख होईल.

वृश्चिक:-जुने प्रश्न मार्गी लावाल. कामाचा ताण वाढू शकतो. वडीलधार्‍यांचा विरोध सहन करावा लागेल. मनातील निराशा झटकून टाका. जुन्या मित्रांशी संपर्क साधता येईल.

धनू:-सामाजिक गोष्टींचे भान राखावे लागेल. प्रामाणिक प्रयत्नांना आपलेसे कराल. फटकळपणे बोलणे टाळा. वाईट संगतीचा मार्ग स्वीकारू नका. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता.

मकर:-कामातील ऊर्जा वाढेल. चिकाटी कमी पडू देऊ नका. सारासार विचाराने उलाढाल करा. प्रेमप्रकरणाला नवीन चैतन्य लाभेल. एकमेकांचे विचार जाणून घ्याल.

कुंभ:-घरात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक सुखसोईंकडे विशेष लक्ष द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मानसिक आनंदाचा दिवस.

मीन:-प्रवासाची आवड भागवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाद्य शिकायला सुरवात करावी. जवळच्या मित्र मंडळींमध्ये दिवस घालवाल. गैरसमजाची ठिणगी पडू देऊ नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 12:43 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 17th july 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरूवार, १६ जुलै २०२०
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १५ जुलै २०२०
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ जुलै २०२०
Just Now!
X