1. मेष:-
    आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. कमिशन मधून कमाई कराल.
  2. वृषभ:-
    मानसिक चंचलता जाणवेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरात अधिकारी व्यक्तींची ऊठबस होईल.
  3. मिथुन:-
    जोडीदाराविषयी मनातील शंका दूर साराव्यात. भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका. मतभेदापासून दूर रहा.
  4. कर्क:-
    कामात चंचलता आड आणू नका. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. नातेवाईकांना सढळ हाताने मदत कराल. हाताखालील लोकांची उत्तम साथ मिळेल.
  5. सिंह:-
    कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विलंबावर मात करावी. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल. बौद्धिक छंद जोपासाल.
  6. कन्या:-
    अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांची तोंडं बंद होतील मुलांचे साहस वाढेल.
  7. तूळ:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेम सौख्यात वाढ होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. बौद्धिक ताण जाणवेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
  8. वृश्चिक:-
    बोलतांना भान राखावे. कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांचा गोतावळा जमवाल.
  9. धनु:-
    जास्त चौकसपणा दाखवाल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण करता येतील. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा.
  10. मकर:-
    जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी. धाडसी शब्द वापराल. अतिचिकित्सा करू नका.
  11. कुंभ:-
    स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. धूर्तपणे वागण्याकडे कल राहील. फार हट्टीपणा करू नका. कामात तत्परता दाखवावी.
  12. मीन:-
    उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कागदपत्रांची योग्य छानणी करावी. जामिनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर