X
X

आजचे राशीभविष्य, शनिवार, २२ फेब्रुवारी २०२०

READ IN APP

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो.
  2. वृषभ:-
    मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल. आर्थिक दर्जा सुधारेल.
  3. मिथुन:-
    गैरसमजाला बळी पडू नका. कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. अतिविचार करू नका.
  4. कर्क:-
    मनाची विशालता दाखवाल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
  5. सिंह:-
    अचानक धनलाभ संभवतो. वारसा हक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
  6. कन्या:-
    गृहशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल.
  7. तूळ:-
    जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल.
  8. वृश्चिक:-
    आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील.
  9. धनु:-
    पित्ताचा त्रास जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. रागावर नियंत्रण ठेवावे.
  10. मकर:-
    कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल.
  11. कुंभ:-
    मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो.
  12. मीन:-
    कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

22

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: February 22, 2020 1:00 am
Just Now!
X