• मेष:-
    ज्येष्ठांशी समजुतीचे धोरण ठेवावे. गृहशांती जपावी. पोटाचे विकार संभवतात. चुकीच्या विचारांना प्रयत्नपूर्वक दूर सारा. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.
  • वृषभ:-
    मुलांच्या वाढत्या करवायांकडे लक्ष द्या. मैदानी खेळ खेळाल. लहानसहान जखमांकडे वेळेवर लक्ष द्यावे. कामात चपळाई दिसून येईल. जुगारापासून दूर राहावे.
  • मिथुन:-
    कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्याल. घरातील शांतता जपावी. नवीन जबाबदारी समर्थपणे पेलाल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
  • कर्क:-
    टीकेला सामोरी जावे लागू शकते. स्व:मतावर आग्रही राहाल. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करावा. मानसिक चंचलता जाणवेल. पराक्रमाला वाव मिळेल.
  • सिंह:-
    खर्च वाढू शकतो. वाद-विवादात सहभाग घेऊ नका. आर्थिक बाबतीत सर्वतोपरी विचार करावा. आवडीचे तिखट पदार्थ खाल. सतत खटपट कराल.
  • कन्या:-
    ध्येय गाठण्याचा पर्यंत करावा. कामात उत्साह जागृत ठेवाल. अधिकाराचा योग्य वापर करावा. आपला रुबाब दाखवाल. जोमाने कामे हाती घ्याल.
  • तूळ:-
    सामाजिक वादात अडकू नका. गैरसमजुती पासून दूर राहा. कचेरीच्या कामात लक्ष घालाल. मोठ्या प्रवासात काळजी घ्यावी. पायाचे विकार संभवतात.
  • वृश्चिक:-
    मनातील प्रबळ इच्छा जागृत ठेवाल. दिवसभर कामाची धावपळ राहील. व्यावसायिक लाभाकडे अधिक लक्ष द्याल. मैत्रीतील मतभेद बाजूस सारावेत. प्रयत्न कमी पडू देऊ नका.
  • धनु:-
    अनपेक्षित बदलांकडे सकारात्मकतेने पहा. गृहशांती जपावी. स्त्री सहवासात रमाल. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. वरचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करावा.
  • मकर:-
    व्यवसायातील तांत्रिकता जाणून घ्या. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. सासरच्या मंडळीना खुश करावे. उपासनेला बळ मिळेल. प्रवासात काळजी घ्यावी.
  • कुंभ:-
    आरोग्याबाबत जागरूकता ठेवावी. गैरसमजाला बळी पडू नका. अपचनाचा त्रास जाणवेल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत सतर्कता ठेवा.
  • मीन:-
    जोडीदाराला चटकन विरोध करू नका. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. जन-विरोधाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक सौख्य लाभेल. कामात एकसूत्रता ठेवा.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर