मेष

गणपतीचे आणि मारूतीचे दर्शन घेऊन लाल फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

गुरूचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी, गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

दत्त महाराजांच्या आणि शनि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – आकाशी

कर्क

शनि मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पति, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – पिवळा

सिंह

ॐ कार या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – नारंगी

कन्या

शनिला तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

पुरूष सुक्तांचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

शनि, मारूती मंदिरात शेंदूर आणि तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग –पांढरा

धनु

ॐ शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – निळा

मकर

शनि, मारूती मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टिने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

मारूती मंदिरात शेंदूर अर्पण करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- पांढरा

मीन

गणपती व मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu