मेष

कालभैरव अष्टकाचा पाठ करावा, गुरू वंदन करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक अडचण कमी होईल. आप्तेष्ठांचा सहवास लाभेल.
आजचा रंग – पिवळा

वृषभ

कुलस्वामिनी आणि कुलदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. आनंदी दिवस. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. महिला आणि गृह उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –नारंगी

मिथुन

महादेव मंदिरामध्ये एक मुठ तांदुळ अर्पण करावे आणि दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धेचा दिवस. प्रगतीकारक ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदी जाईल. वाहने जपून चालवावीत. जमीन आणि पाण्याशी निगडीत व्यवसायांमध्ये यश संभवते.
आजचा रंग – हिरवा

कर्क

कुलदैवताचे स्मरण करून दिवस आनंदात घालवावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. धनस्थिती उत्तम राहील. अडचणींवर मात करू शकाल. जुनी येणी वसुल करण्याच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –पोपटी

सिंह

महादेवाचे आणि कालभैरवांचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. निर्णय क्षमता उत्तम राहील. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दिरंगाई नको.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

कुलदैवतेचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मोठे आर्थिक नियोजन करीत असताना सावध राहावे. वादविवाद टाळावेत. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – लाल

तुळ

ग्रामदैवतेची पुजा करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ घेता येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजना राबवू शकाल.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. अधिकारी व्यक्तींसाठी उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कमोडिटी, शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. आध्यात्मिकता वाढेल.
आजचा रंग –आकाशी

धनु

आज कुलदैवतेच्या मुळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल. व्यवसायामध्ये स्थिरता जाणवेल. नोकरदार मंडळींना कामाचा आणि प्रवासाचा अतिरिक्त ताण येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पांढरा

मकर

कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रवास सावधानतेने करावा. आर्थिक नियोजनामध्ये खंबीर निर्णय क्षमता ठेवावी. प्रवासाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

ॐ श्री आदित्याय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ होईल. जुनी कामे, योजना मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटूंबाशी निगडीत प्रश्न सोडवता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- लाल

मीन

आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. वातविकार, पचनाचे विकार असणाऱ्यांनी दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. शिक्षण, वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu