News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, १३ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष : वारसा हक्काने मिळणार्या स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. आज आपणशुभसमारंभात सहभागी व्हाल. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल.

वृषभ : आपण घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. मामेबहणीच्या विवाहा संदर्भातील शुभघटना कानी येईल. आपल्यालावैवाहिक सुखाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे. मन सैरभैर होईल.

मिथुन : संततीच्या विवाहासंबंधीची बोलणी सफल होतील. आपली महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. महत्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तिचा सल्ला घ्या. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.

कर्क : संततीच्या संदर्भात शुभघटना घडतील. मौल्यवान वस्तूंची आज आपण खरेदी कराल. आज आपण आर्थिक उलाढालीकरण्याचे शक्यतो टाळावे. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो आजच करुन घ्यावीत. मन आनंदी, उत्साही राहील.

सिंह : आज आपल्या संततीचे कार्यक्षेत्र वाढेल. संततीच्या नोकरीतील त्यांचे बढती-बदलीचे योग आपल्याला मानसिकस्थैर्य, प्रसन्नता देतील. कुटुंबावर आज आपल्या मतांचा प्रभाव पडेल. आपल्या वक्तृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल.

कन्या : आज आपल्याला नोकरीनिमित्त कामाची दगदग जाणवेल. कामानिमित्त दूरचे प्रवास करावे लागतील. अपेक्षित गाठीभेटीतून आपली कामे यशस्वीरीत्या पार पडतील. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील.

तूळ : व्यावसायिक दृष्टीने आपले कार्यक्षेत्र वाढण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. अनेक जबाबदारीची कामे स्विकारावीलागतील. व्यवसाय वाढीसाठी मोठय़ा प्रमाणात आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. नवी दिशा सापडेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल.

वृश्चिक : आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकारक घटना घडतील.विज्ञानशाखेतील व्यक्तिंना त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल पुरस्कार जाहीर होतील. जून्या मिळालेल्या ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे कामाचा विस्तार होईल. आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल.

धनू : कुटुंबासाठी आज आपल्याला खर्च करावा लागेल. आज आपले मानसिक स्वास्थ चांगले राहिल. मातुल घराण्याकडूनवारसा हक्काने आर्थिक प्राप्ती होण्याचा योग आहे. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. नशिबाची साथ लाभेल.

मकर : परदेशस्थ मित्रपरिवाराकडून विशेष प्रकारचे लाभ होतील. मेजवानीचे बेत ठरतील. आपण पूर्वी केलेल्या कामाचे संबंधात आपले कौतुक होईल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.

कुंभ : नोकरीत आज आपल्याला बढती-बदलीचे योग संभवतात. व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्यांना आज अनेक सुवर्णसंधी चालून येतील. आपण घेतलेले महत्वाच्या निर्णयांची आज अंमलबजावणी केली जाईल. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल.

मीन : संततीच्या विवाहासंबंधीची बोलणी आज केली असता यशस्वी होतील. आजचा दिवस आपल्यासाठ भाग्यकारकघटनांची पर्वणीच आणणार आहे. संतसज्जनांचा आपल्याला आज सहवास लाभेल. महत्वाचे निर्णय घेताना त्यातील तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्यावे.  कामानिमित्त प्रवास घडून येतील.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 13 december 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ डिसेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ११ डिसेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १० डिसेंबर २०२०
Just Now!
X