• मेष:-
    इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. दानाचे महत्व समजावून सांगाल. धार्मिक बाजू सुधाराल. सर्वांचे आनंदाने कराल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • वृषभ:-
    धार्मिक ग्रंथ वाचावेत. फार चर्चा करत बसू नका. मनातील अकारण असणारी भीती बाजूला सारावी. जोडीदाराला समजून घ्यावे. योग्य वेळेची वाट पाहावी.
  • मिथुन:-
    कसलीही घाई करू नका. कामाचा आनंद मिळेल. तुमच्या मताला महत्व प्राप्त होईल. विरोधकांवर मात करता येईल. विचारांना योग्य चालना द्यावी.
  • कर्क:-
    फसवेगिरीपासून दूर राहावे. जोडीदाराचा समजूतदारपणा दिसून येईल. आरोग्यात सुधारणा होईल. त्वचाविकार बळावू शकतात. भावनेच्या आहारी जाऊ नका.
  • सिंह:-
    नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. कामाचा गोंधळ उडेल. मानसिक दोलायमानता जाणवेल.
  • कन्या:-
    गप्पांच्या ओघात वाहून जाऊ नका. कौटुंबिक सौख्याचा विचार आधी करावा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. जवळचा प्रवास करावा लागेल.
  • तूळ:-
    खर्चाचे प्रमाण वाढू शकते. संपर्कातील लोकांशी सलोख्याने वागावे. तिखट पदार्थांवर ताव माराल. भावंडांची काळजी लागून राहील. घरासाठी काही खरेदी केली जाईल.
  • वृश्चिक:-
    कौटुंबिक प्रश्न सामोरे येतील. जबाबदारीत अधिक वाढ होईल. थोडे अधिक श्रम पडतील. रागावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक प्रश्न भेडसावेल.
  • धनु:-
    चालू कामात खोळंबा येऊ शकतो. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक प्रगतीचा विचार करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
  • मकर:-
    वैवाहिक सौख्य वाढेल. सामुदायिकबाबीत सतर्कता दाखवावी. घराबाहेर वावरतांना सावध राहावे. आरोग्याची वेळेवर तपासणी करावी. मानसिक स्थैर्य जपावे.
  • कुंभ:-
    कामात काही बदल करावे लागतील. अपेक्षित लाभावर लक्ष केंद्रित होईल. मनातील इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष लागून राहील. अधिकाऱ्यांशी आदराने वागावे. नवीन मित्र जोडावेत.
  • मीन:-
    कामावर विशेष लक्ष केंद्रित करावे. मनाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. तुमच्या ज्ञानात अधिक भर पडेल. मानाजोगी खरेदी करता येईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर