05 March 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १२ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. भागदाराशी मतभेद टाळा. जुगाराची आवड जोपासाल. दुरावा टाकण्याचा प्रयत्न करावा.
 • वृषभ:-
  कोर्टाची कामे निघतील. जुन्या गोष्टी उकरून काढू नयेत. भावनेला आवर घालावी. उष्णतेचा त्रास जाणवेल. सामाजिक कामात हातभार लावाल.
 • मिथुन:-
  तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आळस बाजूला सारावा.
 • कर्क:-
  कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. नातेवाईकांची उठबस वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवाल.
 • सिंह:-
  तुमच्या कर्तबगारीला उत्तम वाव मिळेल. हातापायाची काळजी घ्यावी. शुद्ध अंत:कारणाने सर्वांना मदत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील टापटीपीकडे अधिक लक्ष द्याल.
 • कन्या:-
  इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. निसर्ग सौंदर्यात रममाण व्हाल.
 • तूळ:-
  गोड बोलण्यावर भर द्याल. इतरांवर चांगली छाप पाडाल. परखडपणे आपले मत मांडाल. कामाचा जोम वाढेल. तुमच्यातील कार्यप्रविणता दिसून येईल.
 • वृश्चिक:-
  शांतपणे विचार करावा. जुन्या गोष्टी सामोऱ्या येऊ शकतात. खर्चाचे गणित नव्याने मांडावे. गैरसमजामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.
 • धनु:-
  मित्रांशी होणारे मतभेद टाळावेत. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. जमिनीच्या कामातून आर्थिक लाभ होईल. चैनीच्या वृत्तीत वाढ होईल. औद्योगिक वाढीचा विचार करावा.
 • मकर:-
  कामात काही अपेक्षित बदल घडून येतील. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. घरातील कामाची धावपळ राहील. उत्तम कौटुंबिक वातावरण राहील.
 • कुंभ:-
  वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा. दुचाकी वाहन चालविताना काळजी घ्यावी. काटकसर करावी लागेल. उगाचच मनात चिंता निर्माण होईल.
 • मीन:-
  घरातील कामाची धांदल उडेल. जोडीदाराविषयी होणारे मतभेद बाजूला सारावेत. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. मानापमान मनावर घेऊ नयेत. भाजणे,कापणे यांसारखे त्रास जाणवतील.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 12 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १० नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, ९ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X