News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २६ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ संभवतो. संसर्गजन्य विकार त्रास देऊ शकतात. पत्नीशी मतभेद होऊ शकतो. मुलांची मते विरोधी वाटू शकतात.
 • वृषभ:-
  जोडीदाराच्या सहवासात रमाल. भागीदारीत चांगला लाभ होईल. पत्नीचे मत मान्य करावे लागेल. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. शेअर्समध्ये गुंतवणुकीचा पर्याय शोधाल.
 • मिथुन:-
  आरोग्यात सुधारणा होईल. कामे तुमच्या सल्ल्याने पार पडतील. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. मानसिक शांतता जपावी. उगाच चिडचिड करू नये.
 • कर्क:-
  बोलण्याचा आवेग आवरता घ्यावा. कौटुंबिक शांतता जपावी. छंद जोपासण्यात वेळ घालवावा. हाताखालील लोक उत्तम सहकार्य करतील. आरोग्यात सुधारणा होईल.
 • सिंह:-
  तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. भावंडांशी क्षुल्लक गोष्टींवरून मतभेद संभवतात. जवळचा प्रवास काळजीपूर्वक करावा.
 • कन्या:-
  काटकसरीने वागावे लागेल. बोलतांना सारासार विचार करावा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. कामानिमित्त बाहेर वेळ जाईल. तुमचा दर्जा सुधारेल.
 • तूळ:-
  उष्णतेचे त्रास जाणवेल. बाहेरील तामसी पदार्थ खाणे टाळावे. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. तुमच्यातील चातुर्य दाखवाल. आपले मत मांडताना काळजी घ्यावी.
 • वृश्चिक:-
  तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. सामाजिक बांधिलकी जपावी. फसवणुकीपासून सावध राहावे. कर्ज प्रकरणे सावधपणे हाताळावीत. एखाद्या कामात विनाकारण अडकून पडाल.
 • धनु:-
  मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. काही कामे अधिक कस पाहतील. कानाचे विकार त्रास देऊ शकतात. सतत खटपट करत रहाल.
 • मकर:-
  मनातील इच्छा पूर्ण होईल. ओळखीचा सदुपयोग करता येईल. अधिकारी व्यक्ती घरी येतील. सर्वांचे आपुलकीने कराल. बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे.
 • कुंभ:-
  कामाची दगदग राहील. चिकाटीने कामे कराल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यापाऱ्यांना कामाचा व्याप वाढविता येईल. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
 • मीन:-
  वडीलधाऱ्यांचा अवमान करू नका. काही गोष्टींना घरातून विरोध होऊ शकतो. हातातील कामे अर्धवट सोडू नका. उगाच निराश होण्याचे कारण नाही. गैरसमजाला बळी पडू नका.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 26 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २५ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २४ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, २३ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X