27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ०२ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  जोडीदाराशी मनमोकळा सुसंवाद साधाल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. कचेरीच्या कामात दिवस जाईल. फार काळजी करू नये.
 • वृषभ:-
  हातातील कामांना वेग येईल. कामातून उत्तम धनलाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी सलोखा वाढीस लागेल. मुलांची बाजू समजून घ्यावी.
 • मिथुन:-
  रेस,जुगार खेळण्याची हौस पूर्ण कराल. घरगुती मतभेद दूर करावेत. कामाची धावपळ वाढेल. वाहन विषयक कामे पार पडतील. महिलांना बढतीचे योग आहेत.
 • कर्क:-
  घरातील वातावरण प्रसन्न असेल. संभाषण कौशल्य दाखवाल. नवीन मित्र जोडाल. दिवस घाईगडबडीत जाईल. सर्वांशी गोड बोलाल.
 • सिंह:-
  लेखकांना नवीन स्फूर्ती मिळेल. चौकसपणे वागाल. आकलनशक्ती वाढवाल. लहान प्रवास मजेत होतील. बोलण्याने इतरांना प्रभावित कराल.
 • कन्या:-
  तिखट पदार्थ फार खावू नयेत. तुमच्यातील संयम वाढवावा लागेल. चटकन रागवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.
 • तूळ:-
  हसत हसत कामे कराल. जबाबदारीची जाणीव ठेवावी. योग्यवेळी स्मरणशक्तीचा वापर कराल. काही ठिकाणी धूर्तपणे वागाल. कामात तत्परता दाखवावी.
 • वृश्चिक:-
  मनाची चंचलता जाणवेल. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. अयोग्य ठिकाणी सल्ला देवू नका. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. जामिनकीचे व्यवहार जपून करावेत.
 • धनु:-
  काही कामांना योग्य वेळेची गरज भासेल. लहान मुलांमध्ये रमून जाल. जवळचे मित्र भेटतील. चटकन निराश होवू नका. प्रौढपणे विचार मांडाल.
 • मकर:-
  आपले गुण इतरांसमोर सादर करावेत. कामातील विलंब टाळण्याचा प्रयत्न करावा. आशा-निराशेत अडकू नका. आध्यात्मात प्रगती करता येईल. काही कामांना पुरेसा वेळ द्यावा लागेल.
 • कुंभ:-
  विचारपूर्वक आर्थिक व्यवहार कराल. काटकसरीने वागाल. एकांगी विचार करू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे. कामाची लगबग राहील.
 • मीन:-
  अचानक धनलाभाची शक्यता. सामाजिक दर्जा सुधाराल. व्यवहारचातुर्याने वागाल. हटवादीपणे वागू नका. धर्मिक कामात मदत कराल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 02 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ३० सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २९ सप्टेंबर २०१९
Just Now!
X