21 September 2018

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, १४ मार्च २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

HOT DEALS
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%
  • I Kall K3 Golden 4G Android Mobile Smartphone Free accessories
    ₹ 3999 MRP ₹ 5999 -33%

ॐ नारायणाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल.
आजचा रंग –हिरवा

वृषभ

ॐ हरिप्रसादाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना, नोकरदारमंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग –हिरवा

मिथुन

ॐ भालचंद्राय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. व्यवसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठे आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –ऑफ व्हाइट

कर्क

ॐ कर्पूरगौराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदारमंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

सिंह

ॐ शांभवे नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग -तपकिरी

कन्या

ॐ कृष्णपिंगाक्षाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. संतती सौख्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. मोठे निर्णय घेऊ शकाल.
आजचा रंग –निळा

तुळ

ॐ सुरेश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बांधकाम व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ॐ विघ्नराजेंद्राय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये स्पर्धा वाढेल. सहकार्यांचे सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायात नवीन गोष्टी करू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –केशरी

धनु

ॐ गजवक्राय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करता येतील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. नोकरदारांना प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – केशरी

मकर

ॐ धुम्रवर्णाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. भाग्यकारक घटनांचा दिवस. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंड शेतीशी निगडीत व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहे. हितसंबंध दृढ करता येतील.
आजचा रंग –हिरवा

कुंभ

ॐ वक्रतुंडाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
आजचा रंग-मोरपंखी

मीन

ॐ सुमिताय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –हिरवा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

First Published on March 14, 2018 1:14 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 14 march 2018