मेष

ॐ श्री भानवे नमः या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मुलांशी निगडीत किंवा घरांतील धाकट्या भावंडांशी निगडीत चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

ॐ श्री नमः या बीज मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरूवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज कालभैरव अष्टक म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भावंडांशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग –ऑफ व्हाईट

कर्क

ॐ शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडीत व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांसाठी उत्तम दिवस आहे. धन स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

सिंह

गणपती मंदिरात गूळ, खोबरे ठेवून दिवसाचा प्रारंभ करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग -नारंगी

कन्या

गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –निळा

तुळ

गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरूवात करावी. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ॐ श्री नमः या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदार्‍या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग –केशरी

धनु

ॐ श्री नमः या बीज मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडीत नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतीत. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल.
आजचा रंग –राखाडी

मकर

कालीमातेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको.
आजचा रंग –पांढरा

कुंभ

ॐ क्लींम श्री या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांशी निगडीत एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग- मोरपंखी

मीन

देवी कवचाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu