24th February Marathi Panchang Horoscope: २४ फेब्रुवारी २०२४ ला माघी पौर्णिमा तिथी असणार आहे. माघ महिन्यातील या पौर्णिमेला अतिगण्ड योग सुद्धा जुळून येणार आहे. यानुसार आजच्या दिवशी नेमका कोणत्या राशीला सर्वाधिक लाभ होऊ शकतो हे पाहूया..

मेष:-क्षणिक सौख्याचा आनंद मिळवाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. लहानात लहान होऊन रमून जाल. काही कामे दिरंगाईने होतील. औद्योगिक बदल समजून घ्यावेत.

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
venus planet transit in mee shukra transit in pisces these zodiac sign will be success all sector
शुक्र २४ एप्रिलपर्यंत मीन राशीत राहील विराजमान, ‘या’ तीन राशी होणार मालामाल?
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत

वृषभ:-आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. वादाचे कारण उकरून काढू नका. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.

मिथुन:-पोटदुखीसारखे त्रास संभवतात. एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जोडीदाराशी असणारे मतभेद वाढवू नका. एकमेकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वेळेचे योग्य नियोजन कराल.

कर्क:-जोडीदाराच्या प्रगतीत हातभार लावावा. पचनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. व्यायामाचा कंटाळा करू नये. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो.

सिंह:-कामाचा उरक वाढेल. कौटुंबिक समस्या भेडसावतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. तुमच्या मान-सन्मानात भर पडेल. मुलांची प्रगती सुखकर राहील.

कन्या:-अती अपेक्षा ठेवू नये. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून वागा. परोपकाराची जाणीव ठेवावी. हाता-पायाची दुखणी संभवतात.

तूळ:-अनामिक चिंता लागून राहील. समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. प्रवासात सतर्क राहावे. खर्च वाढू शकतो. नातेवाईकांना मदत कराल.

वृश्चिक:-पित्तविकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण जाणवेल. किरकोळ इजा होण्याची शक्यता आहे. मनातील निराशा बाजूला सारावी. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

धनू:-डोळ्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेरील वाटू शकतात. नसत्या भानगडीत लक्ष घालू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक चिंता सतावेल.

मकर:-अति श्रमामुळे थकवा जाणवेल. कामात दिरंगाई होऊ शकते. चिकाटी ठेवावी लागेल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे.

हे ही वाचा<< माघ पौर्णिमेला धन, शक्तीसह अद्भुत योग बनल्याने ‘या’ राशींच्या दारी येईल माता लक्ष्मी; सोन्यानाण्याने उजळेल नशीब

कुंभ:-मानसिक चंचलता जाणवेल. अभ्यासूवृत्ती ठेवून वागाल. कामात तत्परता दाखवावी. सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवाल. हसत-हसत कामे कराल.

मीन:-कागदपत्रांची योग्य छानणी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. ओळखीतून कामे करण्याचा प्रयत्न करावा. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. जवळचा प्रवास मजेत होईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर