Surya Grahan 2024 : हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. २०२४ मध्ये एकूण दोन सूर्यग्रहण होणार असून यातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी झाले. तसेच दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात असून हे ग्रहण सर्वपित्री अमावस्येला असेल. हे ग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे ज्याला ‘रिेंग ऑफ फायर’ देखील म्हटले जाते. वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसले नव्हते. मात्र, दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही? सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी काय असेल, शिवाय हे इतर कोणत्या देशात दिसेल? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

दुसरे सूर्यग्रहण कधी असेल?

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील अमावस्येला असणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरू होईल जे मध्यरात्री ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल. या ग्रहणाची वेळ जवळपास ६ तास ४ मिनिट असेल.

Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Chaturgrahi Yog 2024
उद्यापासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? १०० वर्षांनी ४ ग्रहांची महायुती होताच लक्ष्मी येईल दारी!
For the next 76 days, the fortunes of these three zodiac signs
पुढचे ७६ दिवस ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; बुध देणार यश, कीर्ती अन् बक्कळ पैसा
Shani jayanti on 6th June 2024 Five Zodiac Signs Life To Take Turn
६ जूनला शनी जयंतीपासून 5 राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; पावसाआधी बरसणार धन व सुख, तुम्ही आहात का नशीबवान?
Shukra Gochar 2024
उद्यापासून ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाच्या नशिबाला मिळेल कलाटणी
Mohini Ekadashi, 19th May Panchang & Rashi Bhavishya
मोहिनी एकादशी, १९ मे पंचांग: रविवारी मेष ते मीनपैकी कुणाच्या नशिबात आज नारायणाची कृपा? वाचा तुमचं राशी भविष्य
31st May Lakshmi narayan Yog After 12 Months
१२ महिन्यांनी लक्ष्मी नारायण येतायत घरी! ३१ मेपासून महिनाभरात ‘या’ राशींचे दिवस पालटणार; नशिबात प्रचंड धन, आरोग्य, प्रेम

दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. कारण- ते रात्री लागणार आहे. तसेच पहिले सूर्यग्रहण देखील भारतात दिसले नव्हते.

२०२४ मधील दुसरे सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार?

हे ग्रहण दक्षिण अमेरिकेचे उत्तर भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक, आर्क्टिक, चिली, पेरू, होनोलुलू, अंटार्क्टिका, अर्जेंटिना, उरुग्वे, फ्रेंच पॉलिनेशिया महासागर, उत्तर अमेरिकेचा दक्षिण भाग फिजी, न्यू चिली , ब्राझील, मेक्सिको आणि पेरू या ठिकाणी दिसेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

हेही वाचा: २०२४ संपण्यापूर्वी तुम्हीही होणार श्रीमंत? शनि देवाच्या कृपेने ‘हा’ मूलांक असणाऱ्या व्यक्तींच्या दारी येणार लक्ष्मी

दुसरे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल

वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती ग्रहण असेल. जेव्हा हे घडते तेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो, परंतु त्याचे अंतर पृथ्वीपासून दूर असते. चंद्र पृथ्वीपासूनच्या अंतरामुळे लहान दिसतो. या ग्रहणात सूर्य एका कंकणासारखा दिसतो, ज्याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात.

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी कधी असेल?

हिंदू धर्मग्रंथानुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. पण वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)