scorecardresearch

Premium

१०० वर्षांनी बनतोय गजलक्ष्मी राजयोग; २०२४ मध्ये ‘या’ राशींना गुरु आणि शुक्रदेवाच्या कृपेने प्रचंड पैसा मिळणार?

ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ च्या सुरुवातीला अनेक शुभ राजयोग तयार होणार आहेत. ज्यामध्ये गजलक्ष्मी राजयोगाचा देखील समावेश आहे.

Gajlaxmi Rajyog 2024
१०० वर्षांनी बनतोय गजलक्ष्मी राजयोग. (फोटो – जनसत्ता)

Gajlaxmi Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ च्या सुरुवातीला अनेक शुभ राजयोग तयार होणार आहेत. ज्यामध्ये गजलक्ष्मी राजयोगाचा देखील समावेश आहे. गुरु २ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे तर धनाचा दाता शुक्र १९ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. जेव्हा गुरु आणि शुक्र एकमेकाच्या केंद्र स्थानी, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या आणि सातव्या स्थानी असतात तेव्हा हा राजयोग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे २०२४ मध्ये काही राशींचे नशीब उजळू शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या राशी आहेत, ते जाणून घेऊया.

सिंह रास

dene samajache marathi news, dene samajache initiative pune marathi news
स्वयंसेवीक्षेत्राला पाठबळ देणारा ‘देणे समाजाचे’ उपक्रम!
guru gochar 2024
धन-ऐश्वर्याचा स्वामी गुरु ग्रहाची ‘या’ ३ राशींवर होईल कृपा, मिळेल अपार पैसा!
Shani Budh Shukra Yuti In Kumbh Rashi After Rathsaptami Making These Three Zodiac Signs Rich Golden Period To Begin Astrology
रथसप्तमी होताच कुंभेत सजेल ग्रहांचा मेळा; शनीची त्रिगही युती ‘या’ राशींच्या कुंडलीत आणेल सोन्याचे दिन, काय बदलणार?
Shani Dev
‘केंद्र त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींवर वर्षभर राहणार शनिदेवाची कृपा? मिळू शकते प्रचंड श्रीमंत होण्याची संधी

गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे सिंह राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. २०२४ मध्ये तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. तसेच तुमचे अडकलेले पैसेही मिळू शकतात. कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तुमची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. नवीन वर्षात बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. राजकारणाशी संबंधित लोकांना काही पद मिळू शकते.

धनु रास

गजलक्ष्मी राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुमचे धैर्य वाढेल आणि तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. या काळात केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो.

हेही वाचा- २५ डिसेंबरपासून ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन सुरु? लक्ष्मी कृपेने बक्कळ धनलाभासह व्यवसायात प्रगतीची शक्यता

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात चांगली कामगिरी कराल. कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. मुलांची प्रगती होऊ शकते. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After 100 years gajalakshmi rajyoga is being made these zodiac signs will get huge money with the grace of jupiter and venus in 2024 jap

First published on: 10-12-2023 at 19:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×