scorecardresearch

आर माधवनच्या मुलाने परदेशात भारताचे नाव उंचावले, मुलाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेता, म्हणाला…

आर माधवनने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याच्या मुलाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

r madhavan, vedaant madhavan,
आर माधवनने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याच्या मुलाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

बॉलिवूड अभिनेता आर माधवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आर माधवर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. फक्त आर माधवनच नेहमी चर्चेत नसतो तर त्याचा मुलगा देखील नेहमीच चर्चेत असतो. पण त्याचा मुलगा हा अभिनयामुळे तर एक जलतरणपटू म्हणून ओळखला जातो. वेदांत असे आर माधवनच्या मुलाचे नाव आहे. कोपेनहेगनमध्ये डेन्मार्क ओपनमध्ये रौप्य पदक मिळव देशाची मान उंचावली.

वेदांतचा एक व्हिडीओ आर माधवनने शेअर केला आहे. आर माधवनने शेअर केलेल्या या व्हिडीओत वेदांच रौप्य पदक घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “वेदांतने कोपेनहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी रौप्य पदक पटकावले. प्रदीप सरांचे आभार. आम्हाला सगळ्यांना तुझा सार्थ अभिमान आहे, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींचे स्टायलिश मंगळसूत्र पाहिलेत का?

आणखी वाचा : रानू मंडल नवरीच्या वेषात, ‘कच्चा बदाम’वर गायलेले गाणे झाले व्हायरल

वेदांतने जलतरणात पदक पटकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, वेदांतने बेंगळुरू येथे झालेल्या ४७व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके आणि तीन कांस्यपदके पटकावली होती. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये, वेदांतने लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते आणि त्याच्या कामगिरीमुळेच लोकांनी माधवनच्या मुलाची तुलना अनेक स्टार किड्सशी करायला सुरुवात केली आणि म्हटले की हा फरक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: R madhavan son vedaant madhavan hoists india flag in abroad proud dad shared happiness like this dcp

ताज्या बातम्या