Akshaya Tritiya 2024 : हिंदू पंचांगनुसार दर वर्षी वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीच्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा १० मे २०२४ रोजी शुक्रवारला अक्षय तृतीया साजरी केली जाणार. अक्षय तृतीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरातील साडे तीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्यतृतीया होय. याला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं त्यामुळे या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाला अक्षय असतं. त्यामुळे या दिवशी अनेक जण आवडीने विवाह करतात, गृहप्रवेश करतात, वस्तु किंवा सोनं खरेदी करतात.

ज्योतिषशास्त्रानुसार या अक्षय तृतीयाच्या दिवशी काही अद्भूत संयोग निर्माण होत आहे ज्याचा थेट परिणाम राशीचक्रातील १२ राशींवर दिसून येईल. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि शुक्र आदित्य योग सारखे काही अद्भूत योगचा समावेश आहे. काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येईल पण या खास दिवशी तीन राशींचे नशीब चमकू शकते.तीन राशींना या दिवशी आर्थिक फायदा होऊ शकतो.आज आपण त्या राशी कोणत्या, या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Transit of Venus in Cancer in July
देवी लक्ष्मीची होणार कृपा! जुलै महिन्यात कर्क राशीत शुक्राचे राशी परिवर्तन; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख
Shani Dev Vakri In Kumbh
शनी कृपेने उलट फिरणार नशिबाचे तारे; २०२५ पर्यंत या तीन राशींचे अच्छे दिन, ‘या’ रूपात घरी येईल लक्ष्मी
The persons of these four zodiac signs will get money prosperity and pleasures of wealth
६ जुलैपर्यंत शुक्राचा प्रभाव! ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, समृद्धी व ऐश्वर्याचे सुख
when will be rahu transit
Rahu Gochar : राहु कधी करणार राशी परिवर्तन? ‘या’ राशीला राहावे लागेल सावध
Shani Transit will bring wealth to the persons of these three zodiac signs
२६८ दिवस घरी नांदणार लक्ष्मी; शनीची चाल करणार ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल
vaishakh amavasya 2024
Vaishakh Amavasya 2024 : वैशाख अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग, ‘या’ पाच राशींवर होणार देवी लक्ष्‍मीची कृपा
28th May Marathi Panchang Tuesday Bramha Yog
२८ मे पंचांग: मंगळवारी पूर्ण दिवस ब्रम्ह योग बनल्याने १२ पैकी कोणत्या राशींना धनलाभासह, प्रगतीचे योग; वाचा १२ राशींचे भविष्य
Loneliness, Loneliness of Life , Life Without a Partner, life partner, Emotional Isolation, chaturang article, marathi article,
‘एका’ मनात होती : जोडीदाराशिवायचं एकटेपण!

मेष राशी

अक्षय तृतीयाच्या दिवशी मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअर, व्यवसायात प्रगती होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

हेही वाचा : मे महिना देणार प्रेम, पैसा, प्रसिद्धी… ग्रहयुतीमुळे ‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया फायद्याची ठरेल. या लोकांसाठी अक्षय तृतीया फायद्याची ठरेन. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात वृद्धी होईल. या लोकांना अडकलेली धन संपत्ती परत मिळेल

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून देणारी ठरेल. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. यांना धनसंपत्तीचा लाभ मिळू शकतो. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि यांचा अडकलेला पैसा, धन परत मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)