Budh Gochar In jyeshta nakshatra 2025: बुध ग्रह बु्द्धिमत्ता, व्यवसाय आणि वाणीसाठी जबाबदार असतो. डिसेंबरमध्ये स्वत:च्याच नक्षत्रात बुध प्रवेश करणार आहे. बुध ग्रह शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्रात संक्रमण करेल. ज्येष्ठा नक्षत्रात बुध ग्रहाचे भ्रमण तीन राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. त्यांना व्यवसायात नफा आणि बुद्धिमत्ता वाढण्याची शक्यता आहे. तर मग जाणून घेऊ या कोणत्या तीन राशी आहेत…

मिथुन राशी

ज्येष्ठा नक्षत्रात बुधाचे भ्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. या राशीच्या लोकांमध्ये बुद्धिमत्तेची वाढ होईल आणि ते नवीन व्यवसाय कल्पनांवर काम करू शकतील. त्यांना नोकरी शोधण्यात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या बोलण्यात सकारात्मकता दिसेल. त्यांना जुन्या व्यवसाय योजना अंमलात आणण्याची संधी मिळेल. या राशीच्या लोकांना मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

सिंह राशी

बुध राशीचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ आर्थिक परिणाम घेऊन येईल. त्यांना लक्षणीय यश मिळेल तसंच त्यांच्या कारकि‍र्दीत नवीन उंचीदेखील गाठतील आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या संधीदेखील मिळतील. त्यांचे बोलणे देखील सकारात्मक असेल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मोठा नफा त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करेल. कुटुंब आणि मित्र त्यांना भरपूर मदत करतील.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध राशीचा स्वत:च्या नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ ठरू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असेल. आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील. बुद्धिमत्तेत वाढ होईल आणि या राशीचे लोक त्यांच्या बोलण्याने इतरांचे मन जिंकून घेतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा चांगला काळ आहे. मानसिक शांती मिळेल आणि त्यांची खेळाडू वृत्ती वाढेल.