scorecardresearch

२७ मार्च २०२३ पासून ‘या’ तीन राशींचे अच्छे दिन होणार सुरु? बुधलक्ष्मी देऊ शकते अमाप धनलाभ व प्रेम

Budh Graha Uday: २७ मार्चला बुधाचा उदय होताच काही राशींच्या भाग्यात अच्छे दिन सुरु होऊ शकतात तर काहींना कष्ट सहन करावे लागतील अशीही चिन्हे आहेत. मात्र …

Budh Uday After Gudhi Padwa During Chaitra Navratri These Lucky Zodiac Signs Get More Money and Love Partner Astrology news
२७ मार्च २०२३ पासून 'या' राशी होणार श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mercury Uday In Pisces: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करतात असतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर व एकूणच पृथ्वीवर जाणवू शकतो. येत्या चैत्र महिन्यात सुद्धा काही ग्रह अस्ताला जाणार आहेत तर काहींचा उदय होणार आहे. यामुळे एकूणच १२ राशींच्या कुंडलीत हालचाल जाणवून येऊ शकते. गुढीपाडव्याच्या पाच दिवसनंतर ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह उदयास्थितीत असणार आहे. २७ मार्चला बुधाचा उदय होताच काही राशींच्या भाग्यात अच्छे दिन सुरु होऊ शकतात तर काहींना कष्ट सहन करावे लागतील अशीही चिन्हे आहेत. मात्र या संपूर्ण राशीचक्रातील ३ राशी अशा आहेत ज्यांना अपार धनलाभ व प्रचंड प्रगतीचा काळ अनुभवता येऊ शकतो. या भाग्यवान राशी कोणत्या चला पाहूया…

२७ मार्च पासून ‘या’ राशी होणार बलाढ्य व धनवान?

कर्क रास (Cancer Zodiac)

बुध ग्रहाचा उदय हा कर्क राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. बुध ग्रह आपल्या राशीच्या भाग्यस्थळी भ्रमण करत आहेत यामुळे येत्या काळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. व्यवसायिकांना अर्थजनाचे नवनवीन स्रोत लाभू शकतात. तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी येणारा काळ अत्यंत शुभ आहे. या येत्या महिन्यामध्ये आपल्याला परदेश प्रवासाचे सुद्धा योग आहेत. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी व गृहिणींसाठी सुद्धा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. तुम्हाला छोट्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा योग येऊ शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा व पोटाची काळजी घ्या.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

बुध ग्रहाचा उदय आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. आपल्या राशीच्या पंचम स्थानी बुध ग्रहाचा उदय होत आहे. हे स्थान संतती प्राप्ती, प्रेम, वैवाहिक जीवन व प्रगतीचे मानले जाते. तुम्हाला हात घालाल त्या कामात यश मिळू शकते पण अत्यंत जलद निर्णय घ्यावे लागतील. यामुळे काही अंशी मानसिक ताण वाढू शकतो पण तुम्हाला उद्दिष्ट स्पष्ट ठेवायला हवे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीचा व पगारवाढीचा योग आहे. माता लक्ष्मी अनपेक्षितपणे आपल्या दारी येऊ शकते. तुम्हाला शेअर बाजारातून काही अंशी लाभ होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< आजपासून 3 महिने शनिदेव ‘या’ राशींवर असणार प्रसन्न? पापमोचनी एकादशी तुम्हाला देऊ शकते बक्कळ धनलाभ

धनु रास (Dhanu Zodiac)

बुध देवाचा उदय आपल्या राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. बुध ग्रह आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी भ्रमण करणार आहे. याकाळात आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. आपण शक्य झाल्यास वाहन व प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवू शकता. यातून तुम्हाला प्रचंड धनलाभाचा योग आहे. आपल्याला आईचे विचार कामी येऊ शकतात. तुम्हाला वाडवडिलांकडून आर्थिक पाठबळ सुद्धा लाभू शकते. जर तुमचा व्यवसाय खाण्या- पिण्याशी संबंधित असेल तर लवकरच तुमच्या प्रगतीचे दार उघडू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 19:30 IST