भारताचे महान अर्थतज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात व्यावहारिक जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने अनेक त्रास टाळता येतात आणि चांगले जीवन जगता येते. चाणक्य नीतिमध्ये महिला आणि पुरुषांसाठीही काही खास धोरणे सांगितली आहेत, त्यांचे पालन न केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. चाणक्य नीतिमध्ये असे म्हटले आहे की पुरुषांनी त्यांच्या काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात. अन्यथा त्या समोर आल्यावर त्यांचा आदर कमी होतो.

पुरुषांनी हे गुपित कधीही कोणाला सांगू नये

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

पुरुषांनी काही गोष्टी अगदी जवळच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना सांगू नयेत. कारण या गोष्टी समोर आल्याने त्यांना आयुष्यभर त्रास होऊ शकतो.

अपमान – जर तुमचा अपमान झाला असेल तर हे कोणालाही सांगू नका. तुमचा अपमान इतरांना सांगून तुमचा उरलेला सन्मानही नष्ट होतो. त्यामुळे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य कितीही चांगला असला तरी त्याला अपमानाची बाब सांगू नका. ही गोष्ट स्वतःकडेच राहू द्या.

बायकोशी भांडण- पती-पत्नीमध्ये भांडण होणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु त्याची माहिती इतरांना देऊ नका. तुमच्या जवळच्या मित्रालाही तुमच्या पत्नीचे वाईट सांगू नका किंवा पती-पत्नीच्या अगदी खाजगी गोष्टी सांगू नका. अन्यथा तुम्हाला निंदेला सामोरे जावे लागू शकते आणि पती-पत्नी दोघांचाही समाजात सन्मान डगमगू शकतो.

आणखी वाचा : Chanakya Niti: हे तीन लोक सोबत असतील तर तुमच्यावर संकट येणार नाही

तुमची कमजोरी – प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात काही ना काही ताकद आणि कमतरता असतात. पण तुमची चूक किंवा कमजोरी कोणाला स्वतःहून सांगू नका. अन्यथा लोक नेहमीच तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

तुमची आर्थिक स्थिती – तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल कोणालाही सांगू नका. सर्व संकटांशी लढण्यासाठी पैसा उपयोगी ठरू शकतो. जर तुमच्याकडे खूप पैसा असेल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना याची माहिती मिळाली तर ते पैसे लुटून तुमचे नुकसान करण्याचे अनेक मार्ग अवलंबू शकतात.

(टीप: येथे दिलेली माहिती चाणक्य नीतिमध्ये दिलेल्या माहितीवर आधारित आहे.)