Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये मानले जातात. त्यांची नीती शास्त्रामुळे सध्या लाखो तरुणांना मार्गदर्शन मिळते आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये धर्म, अर्थ आणि कर्म याच बरोबर आयुष्यातील विविध समस्यांबाबत मार्गदर्शन केले आहे. व्यक्तीला मोक्षप्राप्तीसाठी कोणते काम करावे लागते? हे देखील त्यांनी सांगितले आहे. चाणक्य नीती किंवा भागला आज आपण मानवी जीवनातील दानाचे महत्त्व याबद्दल बोलत आहोत. माहिती अशी - चाणक्य नीतीतून दानाचे महत्त्व जाणून घ्या नान्नोदकसमं दानं न तिथिर्द्वादशी समा ।न गायत्र्याः परो मन्त्रो न मातुर्दैवतं परम् ।। या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, ''अन्न आणि पाणी दान करण्यासारखे दुसरे कोणतेही दान नाही. द्वादशी तिथीसारखी दुसरी कोणतीही तिथी नाही, गायत्री मंत्रा सारखा दुसरा कोणताही मोठा मंत्र नाही आणि या विश्वात मातेपेक्षा मोठा कोणताही देव नाही. म्हणून माणसाने नेहमी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. यामुळे तुमची प्रतिष्ठा तर वाढतेच पण जीवनात सुख-समृद्धीही येते.'' हेही वाचा - वडील आणि मुलामध्ये नाते कसे असावे? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती दानेन पाणिर्न तु कङ्कणेन स्नानेन शुद्धिर्न तु चन्दनेन ।मानेन तृप्तिर्न तु भोजनेन ज्ञानेन मुक्तिर्न तु मण्डनेन ।। चाणक्य नीतीच्या या श्लोकात म्हटले आहे की, ''हातांचे सौंदर्य केवळ दान केल्याने वाढते, बांगड्या घातल्या किंवा स्नानही केल्याने हातांचे सौंदर्य वाढत नाही. चंदनाची लेप देखील हातांना ती चमक आणू शकत नाही जी दान केल्यामुळे येते. त्याचबरोबर, सन्मान आणि प्रतिष्ठेने समाधान वाढते, अन्नाचे सेवन केल्यामुळे नाही आणि मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो, शृंगार केल्याने नाही. हेही वाचा – कोणत्याही व्यक्तीसाठी ‘या’ चार ठिकाणी राहणे म्हणजे मूर्खपणा? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती म्हणून दान, मान-सन्मान आणि ज्ञान संपादन करण्यात कधीही संकोच करू नये. जो व्यक्ती या सर्वात पुढे असतो त्यालाच श्रेष्ठ म्हणतात.