‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे सध्या हिंदीतील ‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील गौरवचे अभिनेता कुशल बद्रिके व अभिनेत्री हेमांगी कवीबरोबरच्या स्किटचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. अशाच एका व्हिडीओवर एका नेटकऱ्याने गौरवला ट्रोल केलं आहे. रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड अशा भाषेत गौरवच्या व्हिडीओवर त्या नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे गौरवने देखील सडेतोड उत्तरं त्या नेटकऱ्याला दिली आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘सोनी टीव्ही’ने गौरव, कुशल व हेमांगीच्या स्किटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओवर तो नेटकरी पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला, “रानू मंडल झालाय बिचारा गौरव, फेम मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला. त्याला वाटलं ऑनलाइन फॅन्स त्याचे चित्रपट बघतील, शोचा टीआरपी वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळंच होताना दिसतंय आणि पुढे पण दिसत राहणार. एका पॉइंटला सगळं हातातून जाणार… चांगला अभिनेता होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुक्रट विनोद मारताना बघून, भोजनेचं पण तसंच झालं. नशिबात जे लिहिलंय ते होणारच.” नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर गौरव म्हणाला, “आधी स्वतःच्या अकाउंटवरून बोला, मग आमच्याबद्दल बोला, बाकी गरमी एन्जॉय करा.”

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
rasika vengurlekar and these marathi actors cast on bollywood movie munjya
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं! बॉलीवूडमध्ये मिळाली संधी; चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी
Marathi actor pushkar Shrotri talk about trolling
“आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही,” चिन्मय मांडलेकर, क्षिती जोगच्या ट्रोलिंगवरून भडकला पुष्कर श्रोत्री, म्हणाला, “ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत…”
maharashtrachi hasya jatra fame dattu more got special gift from his wife
“पाय पुरतात का गाडीवर?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेचं भन्नाट उत्तर; म्हणाला…
prithvik Pratap and prathamesh parab dance with friend on Illuminati song of Fahadh Faasil
Video: पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परबचा फहाद फासिलच्या ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “खतरनाक…”
gaurav more and madhuri pawar dances on govinda song
Video : “किसी डिस्को में…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स, जोडीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री
bhushan kadu reveals why he left maharashtrachi hasya jatra
“हास्यजत्रेतून मनाविरुद्ध एक्झिट घेतली”, भूषण कडूने सांगितला खडतर प्रसंग; म्हणाला, “गोस्वामी सरांना…”

हेही वाचा – Video: “बोटिंग, जंगल सफारी अन्…”, मुग्धा वैशंपायनने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला होता साजरा, प्रथमेशने दिलेलं खास सरप्राइज

गौरवच्या उत्तरावर तो नेटकरी पुढे म्हणाला, “मग हे अकाउंट कोणाचं आहे ? स्वतःच्या अकाउंटने म्हणजे नक्की काय असतं ? स्वतःचं नाव मेशन असलेलं अकाउंट? म्हणजे नाव बघून रिप्लाय देणार की खरा फोटो बघून त्यावर कमेंट करणार?” नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेनंतर इतर नेटकऱ्यांनी गौरवची बाजू घेत प्रतिक्रिया दिल्या. अशा लोकांना गौरव उत्तर देऊ नकोस असं इतर नेटकरी म्हणाले. त्यावर तो नेटकरी म्हणाला, “अरे लेका कोणाच्या बाजूने बोलतोयस तू नक्की? माझ्या की महाराज गौरवादित्य? मराठी चांगलं माझं आहे म्हणणं आणि तू स्वतःचं बोलतोयस हिंदीत. मग मी जज करणारच ना. जर हा मराठीपेक्षा हिंदीला महत्त्व देत असेल तर बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड.”

नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर संतापून अभिनेता म्हणाला, “अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाहीये. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चकर मारा फिल्टरपाड्याला सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?” गौरवच्या या प्रतिक्रियेवर तो नेटकरी म्हणाला, “मुळात तुमच्या सारखा दिसणारा व्यक्ती एवढा का मागे आहे कळतं नाही चेहरा बघण्याच्या? हिंमत का लागते स्वतःचा फोटो ठेवायला ? काही लोकांना नाही आवडत स्वतःचे फोटो लावायला, त्यात अगदी हिंमत नाही वगैरे असा बालिश विचार मी तरी नाही केला अजून आणि फिल्टरपाडा अस्वच्छ एरिया आहे. सॉरी मला अ‍ॅलर्जी होईल. पण मी मान्य करतो तू तिथला हिरो असशील नो डाउट.”

हेही वाचा – ‘पुढचं पाऊल’ फेम अभिनेत्याची ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत जबरदस्त एन्ट्री, झळकला ‘या’ महत्त्वाच्या भूमिका

यावर गौरव म्हणाला, “हिंमत पाहिजे नाहीतर अशाना समाजात काय बोलतात माहितीयेना. अहो, चेहरा बघितल्यानंतर कळतं ना हा हिंमत आहे म्हणून आणि कोण आहे हा जो एवढा बोलतो मला ज्याला मी इकडे आमंत्रण सुद्धा दिलं नाही. चला पाटील कोण आहे हे कळू द्या लोकांना या समोर आणि एरिया कसा आहे, तो माझा आहे, माझी भूमी आहे. तुमच्यासारखा लपून नाही बोलतो जे आहे ते समोर आहे. डिपी ठेवा.” गौरवच्या या प्रत्युत्तरानंतरही तो नेटकरी अभिनेत्याला ट्रोल करतच राहिला.

दरम्यान, गौरवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच त्याचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १४ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात गौरवसह अभिनेते मकरंद देशपांडे, सक्षम कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.