Daily Rashibhavishya in Marathi, 17 November  2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

Jupiter Vakri in Taurus
पुढचे ४ महिने नुसता पैसा! देवगुरु वक्री स्थितीत राहून ‘या’ राशींच्या व्यक्तींना करणार लखपती? बघा तुम्हाला आहे का ही संधी?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
More than a thousand people on waiting list right to education admission process for all
यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Guru Vakri 2024
४४ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय, आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? देवगुरुच्या कृपेने मिळू शकतो पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी
Return of demand letter for 258 Agriculture seats from MPSC
कृषीच्या २५८ जागांच्या मागणीपत्राची एमपीएससीकडून परतपाठवणी
Raksha Bandhan Shubh Yog
१८० वर्षांनी रक्षाबंधनाला दुर्मिळ योग बनल्याने लक्ष्मी सोनपावलांनी ‘या’ ५ राशींच्या घरी येणार? धनाने भरु शकते झोळी
Rahu ketu gochar 2024 Rahu-Ketu will do wealth For the next 9 months
राहू-केतू करणार मालामाल; पुढचे ९ महिने ‘या’ चार राशीच्या व्यक्तींचे चमकेल भाग्य अन् मिळेल बक्कळ पैसा

वृषभ:-

अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. अती विचार करू नका. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन:-

कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. स्वभावात करारीपणा बाळगावा. बोलताना तारतम्य बाळगावे.

कर्क:-

राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फलदायी दिवस. घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल. खर्चाचा आकडा वाढता राहील. अधिकारी वर्गाला नाराज करू नका. दिवस धावपळीत जाईल.

सिंह:-

विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका. कलेतून चांगला लाभ होईल. नवीन प्रकल्प हाती घ्याल.

कन्या:-

कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. समस्यांचे निराकरण होईल. लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. रचनात्मक कामे करता येतील.

तूळ:-

आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. भविष्यातील योजनांवर काम चालू करा. मैत्रीचे नवीन प्रस्ताव येतील.

वृश्चिक:-

दिवस धावपळीत जाईल. परंतु केलेल्या कामातून समाधान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.

धनू:-

कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. झोपेची तक्रार जाणवेल.

मकर:-

दिवसाची सुरवात उत्साहात कराल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. भावंडांशी मतभेद संभवतात. मानसिक शांतता जपावी.

कुंभ:-

विरोधकांकडे दुर्लक्ष कराल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. अती तिखट पदार्थ खाऊ नयेत. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आपल्यातील आक्रमकतेला आवर घालावा.

मीन:-

मनातील गैरसमज दूर करावेत. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील. आपल्याच मतावर अडून राहू नका. मानसिक समतोल साधावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.