मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॐ गणनाथाय नमः. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नौकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होइल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचा योग आहे.
आजचा रंग –पिवळा

वृषभ

ॐ भगवंताय नमः. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासात दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणुक करावी. वादविवाद टाळावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ॐ नमः शिवाय. व्यवसायात अनुकुल ग्रह्मान राहिल. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती-पत्नी मध्ये दुरावा कमी होइल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ संरक्षकाय नमः. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कुठल्याही प्रकारचे वादविवाद टाळावे. सहकार्‍यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –निळा

सिंह

ॐ अमोघाय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग -पिवळा

कन्या

ॐ आदिशक्त्यै नमः. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –नारंगी

तुळ

ॐ कपिशाय नमः. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यावसायिकांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

ॐ प्रकाशाय नमः. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना व नोकरदार मंडळीना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग –पांढरा

धनु

ॐ अक्षराय नमः. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान राहिल. ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहिल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –आकाशी

मकर

ॐ सर्वमंगलाय नमः. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावे. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

ॐ सर्वात्मने नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान राहील. व्यवसायांमध्ये अनुकुल वातावरण राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकुल ग्रहमान राहील.
आजचा रंग- पांढरा

मीन

ॐ अतिंद्राय नमः. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना,स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान राहील.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 01 march
First published on: 01-03-2019 at 01:15 IST