मेष
ॐ ऱ्हीं क्लीं शिवाय नमः या बीज मंत्राचे उच्चारण करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टिने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – जांभळा

वृषभ
ॐ नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचे जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
घरांतील देवाला दही भातांचा नेवैद्य दाखवावा. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – तपकिरी

कर्क
सद्‌गुरूचे स्मरण करावे, गुरू मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडी?र्अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – निळा

सिंह
ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – जांभळा

कन्या
कुलदैवत आणि कुमस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – नारंगी

तुळ
महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक  ग्रहमान आहे. कौटुंबिक  सौख्य लाभेल. पति, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक  घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक
गणपती आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – पांढरा

धनु
ॐ शांभवे नमः या मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

मकर
ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, महादेवाची उपासना करावी. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कम्युडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग- पांढरा

मीन
कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज दुपारी ३.०० नंतर चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कम्युडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu