मेष

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – फिकट पिवळा

मिथुन

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायाशी निगडित चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाची उपासना करावी.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. ओम शांभवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

सिंह

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. घरातील धाकट्या भावडांशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. गणपती मंदिरात आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – मोरपंखी

कन्या

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची आज सुरुवात होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – जांभळा

तुळ

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. भावंडाशी वाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आजचा रंग – मोरपंखी

वृश्चिक

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत आणि साहित्यिकांना उत्तम दिवस. धनस्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.

धनु

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. सदगुरुचे स्मरण करावे. गुरू मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – हिरवा

मकर

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. नियोजन पूर्व दिवसाची आखणी करावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

सकाळी ९ वाजल्यापासून चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी उत्तम दिवस. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम.
आजचा रंग – राखाडी

मीन

व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. ओम ऱ्हीं क्लीं शिवाय नमः या बीज मंत्राचे उच्चारण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 20 march
First published on: 20-03-2017 at 01:30 IST