मेष
महादेवाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण दु. ३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – नारंगी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ
आज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये धूप लावून सहस्त्र नामाचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – हिरवा

मिथुन
ओम शांभवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – आकाशी

कर्क
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

सिंह
ओम महालक्ष्मेय नम: या मंत्राचा जप दिवसभर करावा. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – नारंगी

कन्या
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
महादेवाचे दर्शन घ्यावे. एक मूठ तांदूळ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक
शिव मानस पुजेचे वाचन करावे. आज चंद्राचे भ्रमण दु. ३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

धनु
कालशभैरव अष्टक सकाळी, संध्याकाळी वाचावे. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – निळा

मकर
गणपतीची उपासना करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
शिव मानस पुजा करावी. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५१ पर्यंत कर्क राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्त्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग- पांढरा

मीन
महादेवाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण दु.३.५९ र्यंत कर्क राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी सहज उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. संततीश निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 21 august
First published on: 21-08-2017 at 01:30 IST