मेष:-समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. आनंद वार्ता कानी पडतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. अति उत्साह दाखवू नका. जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल.
वृषभ:-आर्थिक योजना गुप्ततेने कराव्यात. शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नातेवाईक नाराज होऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी. बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन:-योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळावेत. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील॰
कर्क:-संधीचे सोने करायला शिका. गृहीणींवरील ताण वाढू शकतो. कठोर परिश्रमाचे चीज होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा.
सिंह:-स्वत:चेच मत खरे करायला जाऊ नका. खेळकरपणे कामे हाताळाल. बौद्धिक ताण जाणवेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.
कन्या:-मानसिक ताण बाजूला सारा. सकारात्मक विचारसरणीचा मार्ग धरावा. जवळच्या मित्राकडून आधार मिळेल. पालकांचे सहकार्य घ्यावे. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.
तूळ:-आवडी-निवडी वर अधिक खर्च कराल. आवडत्या छंदाला वेळ द्यावा. आजचा दिवस शुभ कारक. इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
वृश्चिक:-मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मित्राला मदत कराल. प्रिय व्यक्तिला भेटण्याची ओढ वाटेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी घटना मन खिन्न करू शकते.
धनू:-रागावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल. मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
मकर:-स्वत:च स्वत:ची अवहेलना करू नका. जुनी कामे निघतील. कौटुंबिक शांतता जपावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल.
कुंभ:-नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. बुद्धी आणि विवेक कमी लावावेत. जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. भागीदारीत वर्चस्व दाखवाल.
मीन:-कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. जनसंपर्कात भर पडेल. मनोबल वृद्धिंगत होईल. स्वभावातील उधळेपणा ओळखावा. चटकन नाराजी दर्शवू नका.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, २४ ऑगस्ट २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 24-08-2020 at 00:25 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 24th august 2020 scj