• मेष : ॐ श्रीदेवाय नमः. कौटुंबिक सौख्याचा दिवस. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल.  कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतिकारक ग्रहमान आहेत. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांना आजचे ग्रहमान अनुकूल.

    शुभ रंग – निळा

  • वृषभ ः ॐ जगद्पतये नमः. व्यावसायीक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील.  भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत.  आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल.  छोट्या प्रवासाचे योग आहेत.

    शुभ रंग – आकाशी

  • मिथुन ः ॐ त्रिगुणातिताय नमः. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल.

    शुभ रंग – पांढरा

  • कर्क ः ॐ श्रीकृष्णचंद्राय नमः. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान.

    शुभ रंग – गडद पिवळा

  • सिंह ः ॐ रवये नमः. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.

    शुभ रंग  – नारंगी

  • कन्या : ॐ रामदुताय नमः. सर्व लाभांनीयुक्त ग्रहमान. नवीन योजनांचा पाठपुरावा करु शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.

    शुभ रंग – गडद निळा

  • तुळ ः ॐ गायत्र्यै नमः. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतूक केले जाईल. या महत्त्वाच्या कामांमध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकार वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.

    शुभ रंग – तपकिरी

  • वृश्चिक ः ॐ त्रिमुर्तये नमः. दुपारच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहेत. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतिकारक ग्रहमान आहे. परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान.

    शुभ रंग – पोपटी

  • धनु ः ॐ माधवाय नमः. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.

    शुभ रंग – हिरवा

  • मकर ः ॐ गिरंजनाय नमः. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. कौटुंबीक कलह कमी होतील. सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल.

    शुभ रंग – आकाशी

  • कुंभ ः ॐ कृष्णये नमः. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कम्युडिटीमार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायीकांनी सावधपणे गुंतवणुक करावी. प्रकृतिची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी. वाहने जपून चालवावी.

    शुभ रंग – राखाडी

  • मीन ः ॐ महेश्वराय नमः. मोठ्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. महत्त्वकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.

    शुभ रंग – पांढरा

    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – डॉ. योगेश मुळे
        Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 13 april
First published on: 13-04-2019 at 01:00 IST