मेष

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी निगडित, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. धनस्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. हनुमान चालिसाचे पाठ करणे.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आजचे गृहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य. हनुमान चालिसा पाठ करणे. आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. मारुती दर्शन घेणे.
आजच रंग – केशरी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम. दिवस आनंदी जाईल. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. मारुतीला शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यवसाय नोकरीसाठी उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. मारुतीचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळनंतरचा वेळ आनंदात जाईल. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस करावे. शनी मारुती मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायाशी निगडित चांगली वार्ता समजेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. शनी मंदिरात तेल आणि शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – आकाशी

धनु

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नमः २१ वेळा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. मुलांशी निगडित किंवा धाकट्या भावाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ओम देवेभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची आज सुरुवात होऊ शकते. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील. आनंदवार्ता समजेल. मारुती मंदिरात स्त्रोत्र म्हणून दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग- नारंगी

मीन

आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत, जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा करावा. मारुती मंदिरामध्ये शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – गडद लाल

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu