- मेष:-
हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान शोधाल. पित्ताचा त्रास जाणवेल. दिवस घाईगडबडीत जाईल. वेळेचे नियोजन करावे. - वृषभ:-
कौटुंबिक सुखाला प्राधान्य द्याल. जमिनीचे व्यवहार चांगले होतील. हातात यथोचित पैसा खुळखुळेल. जवळची व्यक्ती विरोधात जावू शकते. कामाकडे चांगले लक्ष ठेवा. - मिथुन:-
कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. घरासंबंधीच्या कामाकडे लक्ष द्यावे. मानहानीचे प्रसंग येवू शकतात. स्पर्धेत भाग घ्याल. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. - कर्क:-
आरोग्यात सुधारणा होईल. वरिष्ठांकडून कौतूक केले जाईल. धाडसाने कामे कराल. इच्छित सुख प्राप्ती होईल. कलेत मन रमवाल. - सिंह:-
क्षुल्लक गोष्टींना फार अवास्तव महत्त्व देवू नका. आवाजात गोडवा ठेवाल. गायन कलेला उठाव मिळेल. आर्थिक गुंतवणूक सतर्कतेने करावी. आवडीला प्राधान्य द्याल. - कन्या:-
रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. तुमच्यातील उर्जेचा वापर करावा. खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. कामातील प्रगतीकडे लक्ष द्यावे. - तूळ:-
अकारण आलेली निराशा झटकून टाकावी. परदेश गमनाची संधी चालून येईल. काही कामांना खीळ बसू शकते. नसत्या गोष्टी उकरून काढल्या जावू शकतात. झोपेची तक्रार जाणवू शकते. - वृश्चिक:-
उत्कृष्ट व्यावसायिक लाभ होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थैर्य लाभेल. मित्रांची उत्तम साथ लाभेल. अधिकारी व्यक्तींची उठबस वाढेल. - धनु:-
तुमच्या आकांक्षांची पूर्ती होईल. हातात पैसा खुळखुळेल. बक्षिसास पात्र व्हाल. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. नवीन ओळखी वाढतील. - मकर:-
वडिलधाऱ्यांचा विरोध होवू शकतो. आपले पद सांभाळावे. अचानकपणे आलेल्या गोष्टींना सामोरे जावे लागेल. इतरांना मदत करावी. मनातील भीती काढून टाकावी. - कुंभ:-
आरोग्याची हेळसांड करून चालणार नाही. चुकीच्या लोकांशी संपर्क ठेवू नयेत. सावधानतेने विचार करावेत. मनातील गैरसमज दूर करावेत. हेकेखोरपणा बाजूला सारावा. - मीन:-
जोडीदाराच्या प्रगतीने भारावून जाल. वैवाहिक सौख्याला बहर येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. भागीदारीत समाधानी असाल. प्रेमसंबंध दृढ होईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, रविवार, २९ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 29-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 29 september 2019 aau