- मेष:-
धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदाने खूश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल. दानाचे महत्व पटवून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. - वृषभ:-
प्रवासात सतर्क राहावे. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल. - मिथुन:-
जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. उगाचच विरोध करणे टाळावे. वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल. - कर्क:-
पोटाचे त्रास संभवतात. फार तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे. - सिंह:-
स्वत:च हेका गाजवाल. मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे. चर्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल. - कन्या:-
कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे. - तूळ:-
मानसिक संवेदनशीलता दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे. मनात काहीशी भीती लागून राहील. नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल. - वृश्चिक:-
घरगुती प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शाब्दिक चकमक टाळावी. - धनू:-
मानसिक चलबिचलता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा. - मकर:-
शांत व संयमी विचार करावा. लोकनिंदेला बळी पडू नका. जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. - कुंभ:-
मित्रांशी मतभेद संभवतात. कसलाही वाद वाढू देवू नका. बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल. वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा. - मीन:-
कामाचा व्याप लक्षात घ्यावा. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा. वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा. कागदपत्रे तपासून घ्यावीत.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, मंगळवार, १७ मार्च २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 17-03-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 17th march 2020 aau