मेष
गणपती अर्थव शीर्षाचे पाठ करणे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ
गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – फिकट पिवळा

मिथुन
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नारंगी

कर्क
गणपती मंदिरात गुलाबाचे फुल अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – निळा

सिंह
आज गणेश स्तुती म्हणणे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – मोरपंखी

कन्या
कुलस्वामिनीचे दर्शन घेणे, ओटी भरणे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – जांभळा

तुळ
महादेवाच्या मंदिरात एक मूठ तांदूळ अर्पण करून दिवसाची सुरूवात करणे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – मोरपंखी

वृश्चिक
ओम श्रीं क्लींम नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – गुलाबी

धनु
कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंडं आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – हिरवा

मकर
गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्त्रोताचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पोपटी

कुंभ
महादेवाचे स्मरण करून ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- जांभळा

मीन
आज दिवसभर अर्थव शीर्ष ऐकावे किंवा पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 20 june
First published on: 20-06-2017 at 01:30 IST