मेष
गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – पांढरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ
गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क
गणपती मंदिरात गुलाबाचे फुले अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह
आज गणेश स्तुती म्हणावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – तपकिरी

कन्या
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. ओटी भरावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – निळा

तुळ
महादेवाच्या मंदिरात एक मुठ तांदूळ अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक
ओम श्रीं क्लिंम नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – केशरी

धनु
कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – राखाडी

मकर
गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्त्रोताचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – पांढरा

कुंभ
महादेवाचे स्मरण करून ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग- मोरपंखी

मीन
आज दिवसभरा अथर्व शीर्ष ऐकावे किंवा पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 25 july
First published on: 25-07-2017 at 01:30 IST