मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॐ विकटाय नमः मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यवसायिक नियोजन उत्तम राहील. कम्युडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

ॐ गुणाधिशाय नमः मंत्र म्हणावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरू बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ॐ शूर्पकर्णाय नमः मंत्र म्हणावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क

ॐ शिवशक्त्यायैय नमः मंत्र म्हणावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. मोठे व्यवसायिक धाडस नको. प्रकृतिची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यवसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – हिरवा

सिंह

ॐ परमगुरूवैय नमः मंत्र म्हणावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – पोपटी

कन्या

ॐ देवाधिदेवाय नमः मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

ॐ जनार्धनाय नमः मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – गडद गुलाबी

वृश्चिक

ॐ एकदंताय नमः मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –गडद निळा

धनु

ॐ सुमंगलाय नमः मंत्र म्हणावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करू शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – निळा

मकर

ॐ चंद्रशेखराय नमः मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

ॐ शशिधराय नमः हा मंत्र म्हणावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग- पांढरा

मीन

ॐ योगेंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. आज दुपारी ३.४६ पासून चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – आकाशी

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 04 october
First published on: 04-10-2017 at 01:14 IST