- मेष:-
कामात चंचलतेला मध्ये आणू नये. एकाग्रता वाढवावी लागेल. सामाजिक वजन वाढेल. काही कामे वेळ काढतील. वारंवार बदल करू नयेत. - वृषभ:-
इतरांना सेवेचे महत्त्व पटवून द्याल. धार्मिक कामात हातभार लावाल. बौद्धिक चुणूक दाखवाल. गुरुकृपेचा लाभ होईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. - मिथुन:-
काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. चुकीच्या कामात अडकू नये. प्रामाणिकपणे कामे हाती घ्यावीत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक स्थैर जपावे. - कर्क:-
एकमेकांतील ओढ वाढेल. वैवाहिक सौख्यात अधिक भर पडेल. प्रवास करावा लागेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कौटुंबिक खर्च वाढेल. - सिंह:-
सतत गप्पांमध्ये रमाल. कमिशनमध्ये फायदा संभवतो. बोलतांना भान राखावे. सर्वांशी गोड बोलण्यावर भर द्याल. काटकसर कराल. - कन्या:-
तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चांगली छाप पडेल. मैत्रीचे संबंध दृढ होतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. हौस पूर्ण कराल. लोक तुमच्यावर खुश होतील. पत्नीचा सुस्वभाविपणा दिसून येईल. - तूळ:-
मनात विचित्र कल्पना बाळगू नका. वेळ ठरवून गाठीभेटी ठरवाव्यात. मनात नसतांना प्रवास करावा लागेल. निष्ठा ढळू देवू नका. घरगुती कामात वेळ निघून जाईल. - वृश्चिक:-
आपलाच हेका पूर्ण कराल. परिस्थितीवर मात कराल. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेवू नये. साहसाने कामे हाती घ्याल. परिस्थिती आवाक्यात आणाल. - धनु:-
प्रवासात सतर्कता बाळगावी लागेल. स्वकष्टाने कामे करण्यावर भर द्याल. सासुरवाडीच्या मंडळींचे सहकार्य घ्यावे. शक्तीची उपासना करावी. पराक्रमाला वाव मिळेल. - मकर:-
तडकाफडकी काही गोष्टी कराव्या लागतील. उष्णतेचे विकार जाणवतील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. पोटाचे विकार जाणवू शकतात. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. - कुंभ:-
काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. क्षुल्लक कारणावरून वाद घालू नयेत. भागादारीत मतभेदाला थारा देवू नये. विवाह विषयक गोष्टी काही काळासाठी पुढे ढकलावेत. रागावर नियंत्रण ठेवावे. - मीन:-
फार काळजी करू नये. फसवणुकीपासून सावध राहावे. चुगल्या करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. निंदा करणारे लोक त्रासदायक ठरू शकतात. कष्टाने कामे पार पडतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 11-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 11 september 2019 aau