मेष

ॐ गोवर्धनपतये नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदारमंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

ॐ ईशान्येय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

मिथुन

ॐ अत्रिनंदनाय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. संतती सौख्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. मोठे निर्णय घेऊ शकाल.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

ॐ नरविराय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बांधकाम व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –निळा

सिंह

ॐ श्रीवर्धनाय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील. स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.
आजचा रंग -तपकिरी

कन्या

ॐ शक्त्यात्मने नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये बढतीचे, पगारवाढीचे योग आहेत. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचे दिवस आहेत.
आजचा रंग –जांभळा

तुळ

ॐ जगद्‌रूपाय नमः मंत्राचा जप करावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल. महत्त्वकांक्षी योजनांची आखणी करावी.
आजचा रंग -तपकिरी

वृश्चिक

ॐ विश्वरूपाय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
आजचा रंग –गुलाबी

धनु

ॐ असैयाय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – हिरवा

मकर

ॐ परमेशाय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

ॐ चैतन्याय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना, नोकरदारमंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग- जांभळा

मीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॐ अमराय नमः मंत्र म्हणावा. आज ८.०५ नंतर चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये असेल. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठे आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu