scorecardresearch

Premium

Festival Calendar 2024: वर्ष २०२४ मध्ये केव्हा साजरी होईल होळी, दिवाळी आणि दसरा? पहा सणांची संपूर्ण यादी

हिंदू कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत उपवास आणि सण कधी साजरे जातील आणि त्याची नेमकी तारीख जाणून घेऊया.

Festival Calendar 2024:
वर्ष २०२४ मधील सणांची संपूर्ण यादी (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Hindu Calendar 2024 Festival List: वर्ष २०२३ आता संपत आले आहे. लवकरच २०२४ सुरू होईल. प्रत्येकजण नव्या वर्षाची आतुरतेने वाट पाहात आहे. नव्या उत्साह आणि अपेक्षांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सूक आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, नवीन वर्ष २०२४ खूप खास आहे, कारण या वर्षी ग्रहांचे गोचर होणार आहे. या वर्षाची अनेक मोठे उपवास आणि सण येणार आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत उपवास आणि सण कधी साजरे जातील आणि त्याची नेमकी तारीख जाणून घेऊया.

वर्ष २०२४ मधील महत्त्वाचे सण आणि उत्सव

मकर संक्रांती २०२४
जानेवारी महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायण करून धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. अनेक वर्षांपासून मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी केली जात आहे, परंतु २०२४ मध्ये हा सण १५ तारखेला साजरी केली जाईल कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे.

madhuri dixit son was fanning bharti singh
…अन् भारती सिंह थक्क झाली! सांगितला माधुरी दीक्षितच्या लेकाचा खास किस्सा; म्हणाली, “सेटवर त्याने…”
20 lakhs fund from dpc for natya sammelan in pimpri says ajit pawar
Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पासाठी अजित पवारांनी लिहिली सविस्तर पोस्ट; म्हणाले, “या अर्थसंकल्पामुळे…!”
masala samosa puri recipe
Samosa Puri : पालकांनो, मुलांना कुरकुरे-चिप्स पेक्षा कुरकुरीत मसाला समोसा पुरी खाऊ घाला, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
shiv-puja-1
Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीचा उपवास पहिल्यांदाच करत असाल तर अशी करा तयारी

महाशिवरात्री २०२४
फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हा भगवान शंकराचा सर्वात महत्वाचा सण आहे. असे मानले जाते की, यावेळी शिव शंकर लिंगाच्या रूपात प्रकट झाले. २०२४ मध्ये महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी होणार आहे.

२०२४मध्ये होळी कधी असते?
२०२४ मध्ये, होळी रविवार २४ मार्च रोजी केली जाईल तर २५ मार्च रोजी धुलिवंदन सण साजरा केला जाईल. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. या महिन्यात पौर्णिमा दोन दिवस राहील.

२०२४मध्ये श्रावण किती दिवस असेल?
भगवान शिवाच्या सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक. भगवान शिव शंकराची अखंड १ महिना पूजा केली जाते. दर सोमवारी शिवमंदिरात भाविकांची गर्दी उसळते. श्रावणातील शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. या वर्षी श्रावण २२ जुलै ते सोमवार १९ ऑगस्ट पर्यंत राहील.

हेही वाचा – मार्गशीर्षातील पहिला व शेवटचा गुरुवार कधी? महालक्ष्मी व्रताच्या ‘या’ मुहूर्ताला गुरुपुष्यमृत योग; पूजा विधी, जाणून घ्या

रक्षाबंधन २०२४
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. यावर्षी रक्षाबंधन हा सण २०२४ च्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.

श्री कृष्ण जन्माष्टमी २०२४
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा हा सण २६ ऑगस्टला साजरा होणार आहे.

गणेशोत्सव २०२४
२०२४ मध्ये ६ सप्टेंबर रोजी हरतालिकेचा उपवास केला जातो तर ७ सप्टेंबरला गणरायची घरोघरी आगमण होते आणि १७ सप्टेंबरला अनंद चंतुर्दशीला विसर्जन केले जाते. १० सप्टेंबर रोजी जेष्ठा गौरी आवाहन केले जाईल,११ सप्टेंबरल गौरी पूजन केली जाईल आणि १२ सप्टेंबर जेष्ठा गौरी विसर्जन केले जाईल

शारदीय नवरात्री २०२४
हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे शारदीय नवरात्र. या काळात ९ दिवस उपवास करून दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्र ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान साजरी होणार असून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे.

२०२४ ची दिवाळी
कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. २९ ऑक्टोबर रोजी धनतेरस सण आहे. ३१ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जाते. १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होईल आणि २ नोव्हेबरला बलिप्रतिपदा व ३ नोव्हेंबरला भाऊबीज साजरा केला जाईल.

हेही वाचा – वर्ष २०२४ मध्ये किती चंद्र आणि किती सूर्य ग्रहण लागणार? जाणून घ्या तारीख आणि वार

हिंदू कॅलेंडर २०२४ (Hindu Calendar 2024 Festival List)

जानेवारी २०२४ मध्ये येणारे उपवास सण
१५ जानेवारी, सोमवार – पोंगल, उत्तरायण, मकर संक्रांती
२९ जानेवारी, सोमवार – संकष्टी चतुर्थी

फेब्रुवारी २०२४ मध्ये येणारे उपवास, सण
१६ फेब्रुवारी – रथ सप्तमी
२८ फेब्रुवारी, बुधवार – संकष्टी चतुर्थी

मार्च २०२४ मध्ये येणारे उपवास, सण
८ मार्च, शुक्रवार – महाशिवरात्री
१८ मार्च – दुर्गाष्टमी
२४ मार्च, रविवार – होळी,
२५ मार्च, सोमवार- धुलिवंदन
२८ मार्च, गुरुवार- संकष्टी चतुर्थी
३० मार्च – रंग पंचमी

एप्रिल २०२४ मध्ये येणारे उपवास सण
९ एप्रिल, मंगळवार- गुढी पाडवा
१७ एप्रिल, बुधवार – राम नवमी
२३ एप्रिल, मंगळवार – हनुमान जयंती,
२७ एप्रिल, शनिवार – संकष्टी चतुर्थी

मे २०२४ मध्ये येणारे उपवास, सण
१० मे, शुक्रवार – अक्षय्य तृतीया
२६ मे, रविवार – संकष्टी चतुर्थी

जून २०२४मध्ये येणारे उपवास, सण
२५ जून – अंगारक संकष्टी चतुर्थी

जुलै २०२४ मध्ये येणारे उपवास, सण
१७ जुलै – बुधवार – आषाढी एकादशी
२१ जुलै, रविवार – गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा व्रत
२२ जुलै – श्रावण
२४ जुलै, बुधवार – संकष्टी चतुर्थी

ऑगस्ट २०२४ मध्ये येणारे उपवास, सण
९ ऑगस्ट, शुक्रवार – नागपंचमी
१९ ऑगस्ट, सोमवार- रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा
२२ऑगस्ट, गुरुवार – संकष्टी चतुर्थी
२६ ऑगस्ट, सोमवार – कृष्ण जन्माष्टमी
२७ ऑगस्ट – गोपाळकाला

सप्टेंबर २०२४ मध्ये येणारे उपवास सण

६ सप्टेंबर, शुक्रवार- हरतालिका
७ सप्टेंबर, शनिवार- गणेश चतुर्थी
८सप्टेंबर रविवार – ऋषिपंचमी
१० सप्टेंबर जेष्ठा गौरी आवाहन
११ सप्टेंबर जेष्ठा गौरी पूजन
१२ सप्टेंबर -जेष्ठा गौरी विसर्जन
१७ सप्टेंबर, मंगळवार – अनंत चतुर्दशी
२१ सप्टेंबर, शनिवार – संकष्टी चतुर्थी

ऑक्टोबर २०२४मध्ये येणारे उपवास सण

३ ऑक्टोबर, गुरुवार – शारदीय नवरात्रीरंभ, घटस्थापना
११ ऑक्टोबर, शुक्रवार – दुर्गा महाअष्टमी पूजा
१२ऑक्टोबर, शनिवार – दसरा, विजयादशमी
१३ ऑक्टोबर, रविवार – दुर्गा विसर्जन
२० ऑक्टोबर, रविवार – संकष्टी चतुर्थी, करवा चौथ
२९ ऑक्टोबर, मंगळवार – धनतेरस,
३१ ऑक्टोबर, गुरुवार- नरक चतुर्दशी

नोव्हेंबर २०२४ मध्ये येणारे उपवास, सण
१ नोव्हेंबर, शुक्रवार – दिवाळी,
२ नोव्हेंबर , शनिवार – गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा
३ नोव्हेंबर, रविवार- भाऊ बीज
१८ नोव्हेंबर , सोमवार- संकष्टी चतुर्थी

डिसेंबर २०२४ मध्ये येणारे उपवास, सण
१८ डिसेंबर, बुधवार – संकष्टी चतुर्थी

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Festival calendar 2024 know all frestival list january to december hindu calendar 2024 snk

First published on: 10-12-2023 at 12:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×