scorecardresearch

Premium

वर्ष २०२४ मध्ये किती चंद्र आणि किती सूर्य ग्रहण लागणार? जाणून घ्या तारीख आणि वार

चंद्र आणि सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व आहे. २०२४ हे नववर्ष आपल्यासोबत किती सूर्य व चंद्रग्रहणे घेऊन येणार आणि ती भारतात दिसणार आहेत की नाही ते जाणून घ्या.

2024 sun and moon eclipse list
वर्ष २०२४ मधील सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहणाच्या तारखा पाहा. [photo credit – freepik]

दरवर्षी कोणते ना कोणते ग्रहण येत असते. ही ग्रहणे काही देशांमध्ये पाहता येऊ शकतात; तर काही देशांमध्ये ती दिसू शकत नाहीत. तसेच ज्योतिषशास्त्रात इतर अनेक बाबींप्रमाणेच ग्रहणांनासुद्धा फार महत्त्व दिले जाते. प्रत्येक ग्रहणाचे प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ असे परिणाम होत असतात. ज्या राशींवर या ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडतो, त्या राशींच्या व्यक्तींना बरेच नुकसान सहन करावे लागते; तर याविरुद्ध ज्यांच्या राशींवर याचा सकारात्मक प्रभाव पडतो, त्यांना भरभरून यश आणि सुखसमृद्धी प्राप्त होऊ शकते.

येणारे २०२४ हे नवीन वर्ष आपल्यासोबतात सुखसंपत्ती, आनंद, उत्साह, यश यांसारख्या बऱ्याच गोष्टी सोबत घेऊन येणार आहे. त्यासोबतच ग्रहणेदेखील घेऊन येणार आहे. या वर्षात चंद्रग्रहणे आणि सूर्यग्रहणे किती असतील आणि ती कधी असतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोबत ही सर्व ग्रहणे भारतातून पाहता येतील की नाही तेसुद्धा लक्षात घ्या.

Shani Uday After 36 Days Making Saturn Most Powerful In Kundali of These Zodiac Signs To Become Crorepati Before Holi 2024 Dates
३६ दिवसांनी शनी होणार शक्तीशाली, ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी; होळीआधी लागेल श्रीमंतीचा रंग
Doubts about Jayant Patil and Vishwajit Kadam about to join bjp is remain
जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याबद्दलचा संशय कायम
Surya Grahan 2024
Surya Grahan 2024 : वर्षाचे पहिले सुर्य ग्रहण केव्हा लागणार? जाणून घ्य तिथी आणि सुतक काळ
Pregnancy: गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय होते? जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं

२०२४ मधील ग्रहणांची यादी पाहा

१. पहिले ग्रहण

नवीन वर्षातील सर्वांत पहिले चंद्रग्रहण असणार आहे. सोमवार, २५ मार्च २०२४ रोजी पौर्णिमेला नेहमी दिसते, तसेच हे ग्रहण दिसणार आहे.

२. दुसरे ग्रहण

पहिले ग्रहण झाल्यानंतर लगेचच १४ दिवसांनी दुसरे ग्रहण लागणार आहे. हे एक सूर्यग्रहण असणार आहे. ८ एप्रिल २०२४ रोजी सोमवारी हे सूर्यग्रहण लागणार आहे.

३. तिसरे ग्रहण

बुधवार, १८ सप्टेंबर २०२४, रोजी, आंशिक चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे.

हेही वाचा : १० डिसेंबरपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु? त्रिग्रही योग बनताच भरमसाठ संपत्ती मिळण्याची शक्यता

४. चौथे ग्रहण

वर्षातील शेवटचे ग्रहण हे २ ऑक्टोबर २०२४ रोजी लागणार असून, हे सूर्यग्रहण असणार आहे. योगायोग म्हणजे हे सूर्यग्रहणदेखील वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाप्रमाणे बरोबर १४ दिवसांनी येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How many solar eclipse and lunar eclipse in new year what are dates of chandra grahan and surya grahan 2024 list dha

First published on: 09-12-2023 at 20:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×