या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असेल. पंचांगानुसार ३० एप्रिल या दिवशी वैशाख महिन्यातील अमावस्या येत आहे. शनिवारी येणाऱ्या या अमावस्यामुळे शनि अमावस्येचा योग तयार होत आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करणं फलदायी असतं. त्यामुळे हे ग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सूर्यग्रहण मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत चालेल. सूर्य ग्रहण मेष राशीत होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही किंवा तो सुतक काळ मानला जाणार नाही. ग्रहण दक्षिण अमेरिकेचा नैऋत्य भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे. या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण तीन राशींना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ : या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. करिअरमध्ये यश मिळू शकते. तसेच अपूर्ण कामेही करता येतील. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First solar eclipse of the year 2022 on shani amavasya rmt
First published on: 31-03-2022 at 09:22 IST