Five powerful Raja Yogas are being prepared after 59 years; The door of fate of these five zodiac signs will open soon | Loksatta

तब्बल ५९ वर्षांनी तयार होत आहेत पाच शक्तिशाली राजयोग; उघडणार ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे दार

तब्बल ५९ वर्षांनी पाच शक्तिशाली राजयोग तयार होत आहेत. या राजयोगांचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु पाच राशींना यावेळी भरपूर यश मिळेल.

Five powerful Raja Yogas
पाच राशींना यावेळी भरपूर यश मिळेल. (फाइल फोटो)

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी संयोग करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. २४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी एक विशेष योग तयार होत आहे. गुरु आणि शनिदेव प्रतिगामी अवस्थेत असून बुध प्रतिगामी अवस्थेत आहे. दुसरीकडे, २४ सप्टेंबर रोजी शुक्राचे संक्रमण होईल आणि एक दुर्बल राजयोग तयार होईल.

याचदरम्यान, नीचभंग राजयोग, बुधादित्य राजयोग, भद्र राजयोग आणि हंस नावाचे राजयोग तयार होत आहेत. नीचभंग राजयोगही दोन प्रकारांमध्ये तयार होत आहे. त्यामुळे या राजयोगांचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु पाच राशींना यावेळी व्यवसाय आणि करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. त्याचबरोबर ते खूप पैसे कमवू शकतात. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • वृषभ

या राजयोगांमुळे या राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचा स्वामी शुक्र १८ ऑक्टोबरपर्यंत नीच स्थितीत राहील. त्यामुळे या राशीच्या संक्रमण कुंडलीत दुर्लभ राजयोग असेल. तसेच गुरु लाभस्थानी असल्याने या काळात त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. त्याच वेळी शनिदेव भाग्यस्थानी विराजमान असल्यामुळे ज्या लोकांचा व्यवसाय लोह, पेट्रोलियम पदार्थाशी संबंधित आहे, अशा लोकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. यासोबतच नवपचम आणि संसप्तक योगही तयार झाल्यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र, पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे काळजी घावी.

Numerology: खूपच नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; कुटुंबासाठीही ठरतात अत्यंत भाग्यवान

  • मिथुन

या राशीच्या संक्रमण कुंडलीच्या मध्यभागी हंस नावाचा राजयोग तयार होत आहे. यावेळी या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. यासोबतच त्यांच्या जीवनसाथीच्या माध्यमातून त्यांना संपत्ती मिळू शकते. दुसरीकडे, जे लोक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत, अशा लोकांसाठी ही वेळ भाग्यशाली ठरू शकते. या काळात या लोकांना मोठे पद मिळू शकते. तसेच त्यांची प्रतिष्ठा वाढू शकते. त्याच वेळी या राशीच्या केंद्रस्थानी तीन शुभ ग्रह आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथही मिळेल.

  • कन्या

या राशीचा स्वामी बुध ग्रह यावेळी उच्च स्थितीत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते. दुसरीकडे, भाग्य आणि संपत्तीचा स्वामी शुक्र ग्रह नीचभंग राजयोग तयार करत आहे. त्यामुळे या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. जे लोक माध्यम, चित्रपट या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. तसेच तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

पुढील २८ दिवस ‘या’ राशींच्या लोकांवर राहील मंगळाची कृपादृष्टी; नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रबळ योग

  • धनु

या राशीच्या संक्रमण कुंडलीत हंस, नीचभंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीचे लोक या काळात व्यवसायात चांगले पैसे कमवू शकतात. तसेच, यावेळी नवीन करार अंतिम केल्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. यावेळी केलेला व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरू शकतो.

  • मीन

हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला आहे. कारण या राशीच्या संक्रमण कुंडलीत शनिदेव लाभदायक स्थानावर विराजमान आहेत. नीचभंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायात मिळालेल्या नव्या ऑर्डर्सचा फायदा होईल. त्याच वेळी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2022 at 21:06 IST
Next Story
Chanakya Niti: या ५ लोकांशी कधीही शत्रुत्व करू नका; तुमचा नेहमीच पराभव होईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल!