Four Shubh Rajyog in 2024: जोतिष शास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्र, राशींना प्रचंड महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. सध्या येत्या ३१ मे २०२४ ला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी बुधदेव वृषभ राशीत गोचर करणार आहेत. जिथे शुक्र, देवगुरु आणि सुर्यदेव आधीपासून विराजमान आहेत. त्यामुळे बुध आणि सूर्याच्या संयोगाने ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल. बुध आणि शुक्राच्या युतीने ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होईल तर शुक्र आणि गुरुच्या संयोगाने ‘गजलक्ष्मी राजयोग’ निर्माण होईल. त्याचप्रमाणे बुध, गुरु, सूर्य आणि शुक्राच्या युतीने ‘चतुर्ग्रही राजयोग’ घडून येईल. या शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो.

‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

वृषभ राशी

शुभ राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुमचे नशीब चमकू शकते. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते. जे लोक सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहेत त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख

(हे ही वाचा : शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ८८ दिवस मिळेल भरपूर पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी)

कन्या राशी

शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होऊ शकतात. तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

धनु राशी

शुभ राजयोगामुळे धनु राशींच्या लोकांसाठी सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. तसेच जे व्यापारी वर्गातील आहेत त्यांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे.  

मकर राशी

चार राजयोगाच्या निर्मितीने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. मकर राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीसाठी फोन येऊ शकतो. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढू शकते. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader