वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो किंवा दुसऱ्या ग्रहाशी युती करून राजयोग तयार करतो, त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर पडतो. ११ नोव्हेंबरपासून गुरू आणि शुक्राच्या युतीमुळे नवपंचम राजयोग तयार झाला आहे. याचा सर्व राशींवर पडणार असला, तरीही तीन राशींना यावेळी विशेष आर्थिक लाभासह यश मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • वृषभ :

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरू तुमच्या संक्रमण कुंडलीत लाभदायक स्थानावर असेल आणि शुक्र सातव्या भावात म्हणजेच वैवाहिक आणि भागीदारीच्या घरात विराजमान असेल. त्यामुळे यावेळी तुम्ही शेअर मार्केटमध्ये चांगले पैसे कमवू शकता. जर तुमची नोकरी किंवा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. यासोबतच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता निर्माण होत आहे. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना या काळात चांगले पद मिळू शकते. यासोबतच समाजात प्रतिष्ठा वाढू शकते.

नोव्हेंबरमधील ग्रह परिवर्तनाचा ‘या’ राशींवर पडणार शुभ प्रभाव; महिन्यातील उरलेल्या दिवसात प्रबळ धनलाभाची संधी

  • कर्क :

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतील भाग्यस्थानात गुरु ग्रह विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. याबरोबरच रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता. तसेच जुन्या गुंतवणुकीतूनही लाभ मिळू शकतो. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते.

Photos : २४ नोव्हेंबरनंतर ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते; गुरुच्या राशी परिवर्तनामुळे मिळणार शुभ वार्ता

  • मिथुन :

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत कर्मस्थानावर गुरु ग्रह आणि सहाव्या घरात शुक्र ग्रह स्थित आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. तसेच, तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. त्याचवेळी, तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तसेच, व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या गंभीर आजारापासून मुक्त होऊ शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru and shukra planet made navpancham rajyog these zodiac sign can get sudden wealth gain pvp
First published on: 12-11-2022 at 18:24 IST