Guru Nakshatra Gochar 2024: गुरु ग्रह एक ठराविक कालावधीसाठी राशी बदलतात. यावेळी गुरु मेष राशीमध्ये विराजमान होत आहेत आणि कदाचित एकच राशीमध्ये आहेत. या व्यतिरिक्त गुरु एक निश्चित कालावधी नंतर नक्षत्र बदलते त्यामुळे १२ राशींच्या जीवनात परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी गुरु शतभिषा नक्षत्रामध्ये विराजमान आहे. तसेच ६ एप्रिलला दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. जिथे ३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राहणार आहे. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. अशा काही राशीचे लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. गुरुच्या पूर्वी भाद्रपद नक्षत्रामध्ये जाण्यामुळे कोणता तीन राशींचे नशीब उजळणार जाणून घेऊ या….

सिंह
सिंह राशीच्या नवव्या स्थानी म्हणजेच भाग्याच्या घरात गुरु ग्रह विराजमान होणार आहे. या राशीच्या लोकांना दिर्घकाळापासून अडकेले काम पूर्ण होऊ शकतात. तसेच या लोकांच्या मेहनत आणि एकाग्रतेच फळ त्यांना नक्की मिळेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्याची संधी मिळू शकते. अध्यात्माच्या दिशेने रुची वाढेल. त्यानुसार, वडील, गुरुचा सहयोग मिळणार आहे. समानाजामध्ये मान -सन्मानाची वृद्धी होईल.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

हेही वाचा – मार्च महिन्यात ग्रहांचे होणार महागोचर! ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल! नोकरी-व्यवसायात मिळेल यश

कर्क
देवगुरूचे गोचर दशम भावात होणार आहे. अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी आता संपतील. यासोबतच सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. यासह तुम्हाला मान-सन्मान मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. पैशाच्या घरात शनीच्या सप्तम भावामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळू शकेल. तुम्ही शेअर्स आणि लॉटरीमधून नफा मिळवू शकता. शेअर बाजारातून तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. याच अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

हेही वाचा – माघ पौर्णिमेपासून ‘या’ राशींचे भाग्य खुलणार? ४ दिवसांनी लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो अपार पैसा

मिथुन राशी
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गुरूचे पाऊल मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला नशिबाचा पूर्ण लाभ मिळेल. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि तुम्ही भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. राजकारणात गुंतलेले लोक उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करतील. याचबरोबर तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यातही तुम्हाला फायदा होईल. तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल आणि मुलांचा आशीर्वादही मिळेल.