Guru Gochar 2024 in Vrishabha Rashi: ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरूचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. आता शुक्रदेवाच्या वृषभ राशीत गुरुदेवाने गोचर केलं आहे. जे २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत. त्यामुळे गुरुदेवाच्या कृपेने येणारे ३७२ दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींना देवगुरुच्या कृपेने होणार अपार धनलाभ?

वृषभ राशी

देवगुरुच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पदोन्नती आणि बदली मिळू शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या काळात मोठा दिलासा मिळू शकतो.

vaishakh amavasya 2024
Vaishakh Amavasya 2024 : वैशाख अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग, ‘या’ पाच राशींवर होणार देवी लक्ष्‍मीची कृपा
गावात राहावे कोण्या बळे?
गावात राहावे कोण्या बळे?
loksatta analysis severe warming in indian cities
विश्लेषण : शहरांमधील तापमानवाढ किती गंभीर? 
Mangal Ruchak Rajyog
४२ दिवस ‘या’ राशींच्या उत्पन्नात होईल प्रचंड वाढ? मंगळदेव मजबूत योग घडवून आणताच होऊ शकतात गडगंज श्रीमंत
Can drinking 4-5 liters of water a day reduce the risk of heart attack
दिवसातून ४-५ लिटर पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होऊ शकते? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Guru Shukra Uday 2024
जूनपासून ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार! हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार नशीब? ५० वर्षांनी २ ग्रहांच्या उदयाने होऊ शकतात मालामाल
gold silver price
Gold-Silver Price: ऐन मतदानाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल, मुंबईतील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक…
Venus Transit 2024
Shukra Gochar: या राशींचे सुरू झाले कठीण दिवस, उत्पन्नावर दिसून येईल दुष्परिणाम; जाणून घ्या, त्या राशी कोणत्या?

(हे ही वाचा : सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? शनीदेवाच्या कृपेने ‘या’ रूपात मिळू शकते श्रीमंती)

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना देवगुरुच्या कृपेने जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतात. आर्थिक बाबतीत खूप फायदा होण्याची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची अपेक्षा आहे. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो.

कन्या राशी

देवगुरुच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना अनेक फायदे मिळू शकतात. अपूर्ण योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या कालावधीत देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. तुम्हाला भागीदारीच्या कामातही यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)