तुम्ही टेलिव्हिजन किंवा यूट्यूबवर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; ज्यात सिंह, चित्ता, बिबट्या इत्यादी जंगलातील मोठे प्राणी कोणत्या ना कोणत्या लहान प्राण्याची शिकार करताना दिसतात. त्याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बिबट्या हा अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडी असो वा गडद अंधार बिबट्या अगदी सराईतपणे शिकार करतो.

सिंह, वाघ, बिबट्या व चित्ता हे सगळे जंगलातील भयानक शिकारी मानले जातात. त्यापैकी बिबट्या हा प्रत्येकापेक्षा वेगळा आहे. कारण- तो शिकार करण्याचं काम कधी आणि कसं करतो हे कोणाला समजतही नाही. त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामध्ये बिबट्याने हरणाची अचानक झेप घेत शिकार केली. तुम्ही काही व्हिडीओंमध्ये पाहिले असेल की, एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर बिबट्या त्याला आपल्या जबड्यात घट्ट धरून ठेवतो आणि नंतर त्याच्यासह झाडाच्या काही उंचीवर चढून जातो. पण, तुम्ही कधी असा व्हिडीओ पाहिला आहे का; ज्यामध्ये बिबट्या झाडाच्या माथ्यावरून आपल्या शिकारीवर उडी घेतो आहे? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जंगलात जिवंत राहायचं असेल, तर सतत पळावं लागतं. मग तो वाघ असो वा ससा, कोणी शिकार करण्यासाठी पळतं; तर कोणी शिकार होऊ नये म्हणून… पण जो थांबतो, त्याचं काय होतं ते तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. तर त्याचं झालं असं की, एका हरणावर बिबट्यानं हल्ला केला.

(हे ही वाचा: घरातील नळाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड; नळाला लावलं चक्क…; अन्…पाहा Video )

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही प्राणी शेतात उभे असल्याचे दिसत आहेत. त्यापैकी एक हरीण झाडाजवळ उभी राहून गवत खात आहे. प,ण ज्या झाडाच्या शेजारी हरीण गवत खात आहे, त्या झाडावर नेमका एक बिबट्या बसला आहे आणि तो योग्य संधीची वाट पाहतोय हे त्या हरणालाही माहीत नाही. बिबट्याला योग्य संधी मिळताच तो हरणावर झेप घेतो. हरीण तावडीतून निसटून पळण्याचा कसोशीनं प्रयत्न करते; पण तो प्रयत्न असफल ठरतो आणि ते हरीण काही वेळातच बिबट्याची शिकार बनते. हरणानं तिथून निसटायला हवं होतं; पण बिबट्यानं हरणाला तशी संधीच मिळू दिली नाही. परिणामी शेवटी त्याचा करुण अंत झाला. बिबट्यानं अतिशय हुशारीनं त्या हरणाची शिकार केली. हे पाहून तुम्हालाही समजेल की, याला जंगलातील सर्वांत ‘निर्दयी शिकारी’ का म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर natureismetal नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हे वृत्त लिहीपर्यंत या व्हिडीओला ३३ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत आणि कमेंट करून नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.