Guru Uday 2024: वैदिक ज्योतिष गणनेनुसार, नऊ ग्रहांमध्ये देवांचा गुरू मानला जाणारा गुरू ग्रह हा सर्वात विशेष मानला जातो. देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत. गुरु हा नेहमीच लाभदायक ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे. देवगुरुचा जून महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. ३ जून २०२४ रोजी दुपारी ३:२१ वाजता वृषभ राशीत गुरूचा उदय होईल. गुरूचा उदय होताच काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येऊन शकतात. याचा नेमक्या कोणत्या राशींना फायदा होईल, जाणून घेऊया…

गुरुच्या उदयामुळे ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू?

कन्या राशी

गुरुच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरु शकते. तुमचे बिघडलेले काम या काळात पूर्ण होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते. समाजात मान-प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता.

Malavya Rajyog
३६५ दिवसांनी मालव्य राजयोग; सप्टेंबरपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाचे येणार सुखाचे दिवस?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?
The Vishrantwadi Police in Pune returned the missing mobile sets to the citizens Pune
पोलिसांकडून राखी पौर्णिमेची अनोखी भेट; गहाळ झालेले ४० मोबाइल संच तक्रारदारांना परत
Shani Nakshatra Parivartan 2024
७ दिवसांनी शनीकृपेने ‘या’ राशींना मिळेल गडगंज श्रीमंती? कर्म बदलल्यास लाभेल अपार पैसा, आयुष्याचं होईल सोनं?
Nagpanchami Shubh Yog
५०० वर्षांनी नागपंचमीला ५ शुभयोग; ‘या’ राशींना महादेव देतील अपार धन? नागदेवताच्या कृपेने घरात येऊ शकतो चांगला पैसा
Shravan 2024 Shubh Yog
७० वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; भोलेनाथांच्या कृपेने ‘या’ राशींचे आयुष्य होईल गोड, अचानक धनलाभाची संधी? तुमची रास आहे यात?
Sun Transit in Leo
रक्षाबंधनाआधी ‘या’ राशीधारकांना मिळणार बक्कळ पैसा, होणार श्रीमंत? सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला मिळणार का पेढे वाटण्याची संधी  

(हे ही वाचा : ४२ दिवस ‘या’ राशींच्या उत्पन्नात होईल प्रचंड वाढ? मंगळदेव मजबूत योग घडवून आणताच होऊ शकतात गडगंज श्रीमंत)

वृश्चिक राशी

गुरुच्या उदयामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी तुमच्यासाठी वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करण्याचे योग निर्माण होत आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे चांगल्या ऑफर येऊ शकतात. या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात.  तुम्हाला व्यवसायात चांगला परतावाही मिळू शकतो. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारची मदत मिळू शकते. तसंच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते.

मकर राशी

गुरुची उदय स्थिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो.  शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.  प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमचं बँक बॅलन्स वाढवण्यात यशस्वी होऊ शकता. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)